Tarun Bharat

पुणे विभागातील 5 लाख 41 हजार 14 रुग्ण कोरोनामुक्त!

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 5 लाख 41 हजार 14 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 64 हजार 346 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 7 हजार 667 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 665 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.78 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.87 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.


पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 63 हजार 551 रुग्णांपैकी 3 लाख 48 हजार 858 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 5 हजार 963 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 730 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.40 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.96 टक्के आहे.

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 734 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 572 , सातारा जिल्ह्यात 70, सोलापूर जिल्ह्यात 66, सांगली जिल्ह्यात 19 तर कोल्हापूर जिल्ह्यात 07 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.


आजपर्यत विभागामध्ये एकुण 33 लाख 22 हजार 636 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 64 हजार 346 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

पुणे : प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

Tousif Mujawar

खासदारांशी तू तू-मै मै झाल्यानंतर शंकेची पाल चुकचुकली;जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांची प्रतिक्रिया

Archana Banage

लसीकरणात महाराष्ट्राने ओलांडला एक कोटींचा टप्पा

Archana Banage

खासदार गावितांचा शिंदे गटात प्रवेश नाही- मुख्यमंत्री शिंदे

Archana Banage

उध्दव ठाकरेंची मुलाखत ही फिक्स मॅच ; देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र

Abhijeet Khandekar

सोलापूर : बार्शीत आधी कोरोना चाचणी मगच दुकान उघडण्यास परवानगी

Archana Banage
error: Content is protected !!