Tarun Bharat

पुणे विभागातील 5 लाख 46 हजार 991रुग्ण कोरोनामुक्त!

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 5 लाख 46 हजार 991 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 70 हजार 36 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 7 हजार 284 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 761 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.76 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.96 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.


पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 68 हजार 98 रुग्णांपैकी 3 लाख 53 हजार 639 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 5 हजार 661 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 798 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.39 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.07 टक्के आहे.

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 788 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 610 , सातारा जिल्ह्यात 53, सोलापूर जिल्ह्यात 106, सांगली जिल्ह्यात 13 तर कोल्हापूर जिल्ह्यात 06 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.


आजपर्यत विभागामध्ये एकुण 34 लाख 21 हजार 317 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 70 हजार 36 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

Related Stories

संजय राऊत यांना 100 कोटींची मानहानीची नोटीस

datta jadhav

‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ मालिकेची प्रेस कॉन्फरन्स घरी बसून पडली पार

Tousif Mujawar

पुणे विभागातील 5 लाख 40 हजार 130 रुग्ण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

”स्वामीनिष्ठेसाठी बलात्कारासारख्या विषयाचे भांडवल करणं निंदनीय”

Archana Banage

महाराष्ट्रात मागील 24 तासात 9,361 नवीन कोरोनाग्रस्त; 190 मृत्यू

Tousif Mujawar

स्वराज्य संघटनेच्या प्रवक्तेपदी डॉ.धनंजय जाधव, करण गायकर यांची निवड

Archana Banage
error: Content is protected !!