Tarun Bharat

पुणे विभागातील 5 लाख 79 हजार 550 रुग्ण कोरोनामुक्त!

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे :

पुणे विभागातील 5 लाख 79 हजार 550 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 2 हजार 810 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 7 हजार 52 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 208 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.69 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.14 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 94 हजार 726 रुग्णांपैकी 3 लाख 80 हजार 368 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 5 हजार 294 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.30 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.36 टक्के आहे.पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 475 आहे.

पुणे जिल्हयामध्ये 392, सातारा जिल्हयामध्ये 33, सोलापूर जिल्हयामध्ये 24, सांगली जिल्हयामध्ये 19 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 7 रुग्णांचा समावेश आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 38 लाख 84 हजार 484 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 2 हजार 810 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

Related Stories

पीएमएलए कायद्याचं भवितव्य आज ठरणार; 100 याचिकानंतर आज सुनावणी

Abhijeet Khandekar

‘सारेगमप’ चे लिटिल चॅम्प्स पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

Abhijeet Shinde

पेगॅससची चिंता सोडा, पेंग्विनची चिंता करा; चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर निशाणा

Abhijeet Shinde

येरवडा मनोरुग्णालयात अनैसर्गिक कृत्याचा प्रकार

datta jadhav

… तर कोल्हापुरात तांडव होईल; नितेश राणेंचा इशारा

Archana Banage

भाजपला शिवसेनेची चिंता का ?; तर शरद पवार ‘जरा शहाण्या माणसाबद्दल विचारा’ असे का म्हणाले?

Abhijeet Shinde
error: Content is protected !!