Tarun Bharat

पुणे विभागातील 5 लाख 82 हजार 683 कोरोनामुक्त!

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 5 लाख 82 हजार 683 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 6 लाख 8 हजार 286 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 9 हजार 340 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 16 हजार 263 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.67 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.79 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 99 हजार 308 रुग्णांपैकी 3 लाख 82 हजार 909 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 7 हजार 299 आहे. कोरोनाबाधित एकूण 9 हजार 100 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 95.89 टक्के आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 39 लाख 49 हजार 793 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 6 लाख 8 हजार 286 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

पहिल्याच इंग्रजी पेपरमधील चुकांनी विद्यार्थी बुचकाळ्यात

Abhijeet Khandekar

अजितदादा घटनेत बदल करा असं म्हणायचं आहे का? एकनाथ शिंदे

Abhijeet Khandekar

शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ न्यायालयाकडून बरखास्त

datta jadhav

MPSC परीक्षा पद्धतीतील सुधारणा 2023 पासून लागू

datta jadhav

महाराष्ट्राने लसीकरणात ओलांडला दीड कोटींचा टप्पा : आरोग्यमंत्री

Archana Banage

पोटनिवडणुका बिनविरोध होतील, हे त्यांनी डोक्यातून काढावं

datta jadhav
error: Content is protected !!