Tarun Bharat

पुणे विभागातील 56, 414 रुग्ण कोरोनामुक्त!

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 56 हजार 414 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या  95 हजार 76  झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 36 हजार 77 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 2 हजार 585 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच  955 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 59.34 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण  2.72 टक्के इतके आहे, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्हयातील 76  हजार 669 बाधीत रुग्ण  असून कोरोना बाधित 47  हजार 197  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 27 हजार 663 आहे. 

                                              
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 809 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 254 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 322 , जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 53, पुणे कॅन्टोंन्मेंट 31 , खडकी विभागातील  37, व ग्रामीण क्षेत्रातील 112 , रुग्णांचा समावेश आहे. तसेच  698 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण  61.56  टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.36 टक्के इतके आहे.


आजपर्यत विभागामध्ये एकुण 4 लाख 69 हजार  420 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 4  लाख 64 हजार  547 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर  4 हजार 873  नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी  3 लाख 68  हजार 625 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आहे. 

Related Stories

वीज दरामध्ये मोठी वाढ; आता युनिटनुसार कसे असणार दर, जाणून घ्या

Abhijeet Khandekar

अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीनचिट

Patil_p

पुणे विभागात कोरोना रुग्ण संख्या 58,098 वर

Tousif Mujawar

पडद्यावरचा ‘हा’ खलनायक बनला स्थलांतरीतांचा देवदूत

Archana Banage

सप्टेंबरमध्ये महाविद्यालये सुरू, लवकरच निर्णय

Archana Banage

माझ्याकडे ४० आमदार तीच खरी शिवसेना,एकनाथ शिंदे यांचा दावा, शिंदे आज राज्यपालांना भेटणार

Rahul Gadkar