Tarun Bharat

पुणे विभागातील 9 लाख 93 हजार 630 जण कोरोनामुक्त!

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 9 लाख 93 हजार 630 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 11 लाख 69 हजार 308 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 1 लाख 53 हजार 409 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 22 हजार 269 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.90 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 84.98 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.


पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 8 लाख 29 हजार 505 रुग्णांपैकी 7 लाख 20 हजार 121 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 96 हजार 551 आहे. कोरोनाबाधित एकूण 12 हजार 833 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.55 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 86.81 टक्के आहे.

पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 21 लाख 86 हजार 621, सातारा जिल्ह्यामध्ये 5 लाख 97 हजार 320, सोलापूर जिल्हयामध्ये 3 लाख 9 हजार 679, सांगली जिल्हयामध्ये 5 लाख 39 हजार 530 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 9 लाख 46 हजार 440 नागरिकांचा समावेश आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 67 लाख 20 हजार 490 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 11 लाख 69 हजार 308 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

पुण्यात लॉकडाऊन लागणार?;अजित पवार घेणार आढावा बैठक

Archana Banage

आम्ही उद्धव ठाकरेंसोबत, सुनील महाराजांची पहिली प्रतिक्रिया

Archana Banage

शरद पवारांच्या पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर

Archana Banage

पुण्यात भरधाव ट्रकची 8 वाहनांना धडक

datta jadhav

‘सांगलीचा पालकमंत्री बदला, जिल्हा वाचवा’; निलेश राणेंचं मंत्री जयंत पाटलांवर टीकास्त्र

Archana Banage

संचारबंदी निरुपयोगी, आता लॉकडाऊनच

Archana Banage