Tarun Bharat

पुणे विभागात कोरोना रुग्णांची संख्या 51,198 वर

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 31 हजार 390 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 51 हजार 198 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 18 हजार 196 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 612 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 654 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 61.31 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण   3.15  टक्के आहे,अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.


पुणे जिल्ह्यातील4 2 हजार 846 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 26 हजार 623 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 15 हजार 78 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 145 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 424 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.14 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.67 टक्के इतके आहे.


आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 57 हजार 428 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 52 हजार 541 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 887 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 2 लाख 841 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 51 हजार 198 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. 

Related Stories

पुणे फॅशन स्ट्रीटला लागलेली आग आटोक्यात; लाखोंचे नुकसान

Tousif Mujawar

बीडमध्ये सपना चौधरीचे ठुमके अन्…

Abhijeet Khandekar

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला भरधाव पिकअपचा धक्का

Tousif Mujawar

महा एनजीओ फेडरेशनला राज्यपाल्यांच्या हस्ते विशेष पुरस्कार

Tousif Mujawar

आपत्ती काळात पुनर्वसन मंत्री नाही हे दुर्दैव !

Archana Banage

शिवसेना प्रवक्त्यांची नवीन यादी; संजय राऊत, अरविंद सावंत सेनेचे मुख्य प्रवक्ते

Archana Banage