Tarun Bharat

पुणे विभागात 1 लाख 21 हजार 772 कोरोनामुक्त

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 1 लाख 21 हजार 772 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 70 हजार 196 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 43  हजार 958  इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 4  हजार 466 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण  2.62 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 71.55 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 27 हजार 26  रुग्णांपैकी 97  हजार 335  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 26 हजार 727 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 964 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.33 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 76.63 टक्के आहे. 


आजपर्यत विभागामध्ये एकुण 8 लाख 21 हजार 773  नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 70 हजार 196  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

मी नाराज नाही; अब्दुल सत्तारांचे स्पष्टीकरण

Archana Banage

भीमा कोरेगाव प्रकरण : शरद पवारांची तिसऱ्यांदा नोंदवली साक्ष

Archana Banage

कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Abhijeet Khandekar

RTE च्या विद्यार्थ्यांसाठी कोरोनापूर्वीचे शुल्क

datta jadhav

पक्षासाठी सून करतेय सासूविरोधात प्रचार

datta jadhav

लॉकडाऊनआधी बारामतीकरांची भाजी मंडईत गर्दी

Tousif Mujawar