Tarun Bharat

पुणे विभागात 5.59 लाखांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त!

Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 5 लाख 59 हजार 681 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 81 हजार 958 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 6 हजार 286 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 991 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.75 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.17 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.


पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 77 हजार 57 रुग्णांपैकी 3 लाख 63 हजार 276 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण 4 हजार 852 आहे. यामध्ये 4 स्ट्रेन या नवीन कोरोनाबाधित रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 929 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.37 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 96.35 टक्के आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकुण 36 लाख 41 हजार 910 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 81 हजार 958 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

कोल्हापुरात दक्षिण आफ्रिकेचा मालवी आंबा दाखल

Archana Banage

”मराठा आरक्षणासाठी आपल्याकडे अजूनही मार्ग खुला”

Abhijeet Shinde

केंद्र सरकारने ‘या’ निर्णयाचा पुनर्विचार करावा : रोहित पवार

Rohan_P

आणि चक्क शिल्पाने विमानतळावरचं सुरु केला व्यायाम!

Kalyani Amanagi

बिडी कामगार रोजगार रक्षणासाठी रस्त्यावर

Rohan_P

पुणे विभागातील 5 लाख 26 हजार 697 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P
error: Content is protected !!