Tarun Bharat

पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर परांजपे बंधू मुंबई पोलिसांच्या ताब्यात

  • फसवणुकीचा गुन्हा दाखल
Advertisements

ऑनलाईन टीम / पुणे : 

पुण्यातील नामांकित बिल्डर परांजपे बंधूना मुंबई पोलिसांकडून फसवणूकीच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले आहे. वसुंधरा डोंगरे या 70 वर्षीय महिलेने बिल्डर श्रीकांत परांजपे आणि शशांक परांजपेे यांच्या विरोधात फसवणूकीची तक्रार केली होती.

मुंबई पोलिसांच्या डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, मुंबईतील विलेपार्ले पोलीस ठाण्यात बांधकाम करणार्‍या श्रीकांत परांजपे, शशांक परांजपे आणि आर पाटील यांच्याविरोधात कलम 406, 420, 464, 467, 468 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. 

व्यावसायिक कामात फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. एका वृद्ध महिलेच्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी रात्री उशिरा परांजपे बंधूंना पुण्याहून मुंबईला आणले. डीसीपी सिंगे हे म्हणाले की, तक्रारदाराने आपल्या तक्रारीत माधव परांजपे आणि राघवेंद्र पाठक यांचेही नाव लिहले आहे.

खरेतर, आरोपींविरोधात जानेवारी 2020 मध्ये फसवणूक आणि बनावटपणाचा असाच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणातही चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दोन्ही भावांना चौकशीसाठी बोलावले आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे या महिलेस फसवून ताब्यात घेतल्याचा आरोप दोन्ही भावांवर आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यातील बिल्डर्स विरोधात कारवाई करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी पुण्यातील अमित लुंकड बिल्डरला देखील पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ठेविदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर बिल्डर अमित लुंकड याला अटक करण्यात आली असून सध्या तो येरवडा जेलमध्ये आहे.

Related Stories

शिवाजीनगरमध्ये पहिले कोरोना लसीकरण सहायता केंद्र : सिद्धार्थ शिरोळे

Rohan_P

अमेरिकन सैन्याकडून 3200 नागरिकांची सुटका

datta jadhav

आव्हाडांनी अण्णांना दिल्या वाढदिवसाच्या उपरोधिक शुभेच्छा; म्हणाले…

datta jadhav

सरपंच आरक्षण निवडणुकीनंतरच

Abhijeet Shinde

मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती तर एवढं घडलं नसतं – संभाजीराजे छत्रपती

Abhijeet Shinde

संभाजीराजेंचा सर्वांनी ठरवून गेम केलाय;भाजप आमदाराचा निशाणा कोणावर?

Abhijeet Shinde
error: Content is protected !!