Tarun Bharat

पुण्यात गणेशोत्सवादरम्यान जमावबंदी

पुणे/प्रतिनिधी

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी पुण्यात गणेशोत्सवादरम्यान जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. पुणे शहरामध्ये १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबरपर्यंत १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. पुणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून पोलीस आयुक्तालय क्षेत्रात जमावबंदी, प्रार्थनास्थळंबंद ठेवण्यासंबंधी तसेंच संचारास मनाई करणारे आदेश लागू केले आहेत. दरम्यान राज्य सरकारनेही गणेशोत्सव सध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन केले आहे. तसेच गणेशोत्सवासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत पुण्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांची भर पडली आहे. पुन्हा शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये रस्त्यात, सार्वजनिक जागेत, सार्वजनिक गणेश मंडळाच्या समोर ज्वालाग्रही (रॉकेल, डिझेल, पेट्रोल, गॅस इ.) पदार्थाच्या सहाय्याने आगीचा लोळ निर्माण करण्यास किंवा हवेत सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश १० सप्टेंबरपासून ते १९ सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल अशा इशारा पुणे शहर पोलीस सह आयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी दिला आहे.

Related Stories

चीनने वाढवले संरक्षण बजेट

datta jadhav

बार्शी तालुक्यातील शेलगाव(मा) हद्दीतील ओढ्यावरील बंधारा गेला वाहून

Archana Banage

दिल्ली, एनसीआरमध्ये 24 तासात दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के

prashant_c

शी जिनपिंग तिसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष

datta jadhav

महाराष्ट्रासहित सिंधुदुर्ग आणि मातोंड गावच्या उन्नतीसाठी मी प्रयत्नशील- नार्वेकर

Anuja Kudatarkar

ऑलिम्पिक तिकीट मिळवलेला कुस्तीपटू सुमित मलिक डोप टेस्टमध्ये फेल

Archana Banage