Tarun Bharat

पुण्यात रोजगार अधिकार अभियानाचा शुभारंभ

ऑनलाईन टीम / पुणे :

कोरोनाच्या संकंटामुळे अनेकांचे रोजगार गेले. अनेकांचे रोजचे जगणे कठीण झाले. सुशिक्षीत, उच्चशिक्षीत असूनही लाॅक डाऊनमुळे अनेकांना रोजगारावर पाणी सोडावे लागले. या कठीण काळात महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक समिती आणि रिपब्लिकन पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने अन्नदान, औषध वाटप आदी प्रकल्प हाती घेण्यात आले होते. आता याच अभियानाचा भाग म्हणुन पुढील टप्पा रोजगार अधिकार अभियानाचा आज प्रारंभ करण्यात आला.

महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक पुतळ्याजवळ हा कार्यक्रम संपन्न झाला. महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून आणि बोधिवृक्षास जल अर्पण करुन अभियान यशस्वीतेसाठी कटिबद्धता प्रतिपादीत करून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते राहूल डंबाळे, सुवर्णा डंबाळे, विठ्ठल गायकवाड, बाबा कांबळे, लताताई राजगुरु, कुणाल राजगुरु, अरुण गायकवाड, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगिता तिवारी, भाई विवेक सावंत, दत्ता पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.

रोजगार अधिकार अभियाना अतंर्गत कुशल अकुशल कामगारांशी संबंधीत सुमारे साडे चारशे पेक्षा अधिक क्षेत्रांत रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे युवा नेते राहूल डंबाळे यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

फुगेवाडीमध्ये कोसळला स्लॅब ; ढिगाऱयाखाली अडकलेली ‘ती’ मुलगी तीन तासाने सुखरूप बाहेर

Tousif Mujawar

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

Archana Banage

हिंमत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा : सोमय्या

Abhijeet Khandekar

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार भामा-आसखेडचे लोकार्पण

Tousif Mujawar

साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवृत्त न्या. नरेंद्र चपळगावकर

datta jadhav

कोरोनावर लस विकसित करण्यासाठी 30 माकडांवर प्रयोग

datta jadhav