Tarun Bharat

पुण्यात 24 तासात कोरोनाचे तीन बळी

ऑनलाईन टीम / पुणे : 

पुण्यात मागील 24 तासात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन वृद्धांचा आणि 48 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबळींची संख्या आता 5 वर पोहचली आहे.

पुण्यातील ससून रुग्णालयात शनिवारी रात्री एका 48 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. त्याचा स्वॅब रिपोर्ट रात्री उशिरा आल्यानंतर त्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

 तर याच रुग्णालयात आज एका ६० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी या वृद्धेचा नायडू रुग्णालयात कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने  तिला डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, ती पुन्हा आजारी पडल्याने तिला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचा स्वॅब रिपोर्ट तपासणी पाठवला असता तो पॉझिटिव्ह आला.   

  गुलटेकडी परिसरातील स्लम भागात राहणाऱ्या 69 वर्षीय वृद्धाचाही कोरोनामुळे औंध येथील एका रूग्णालयात मृत्यू झाला आहे. या तिन्हींही मृतांची कोणतीही प्रवासाची हिस्ट्री नाही. त्यामुळे पुण्यातील नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

‘मतवाली मनचली कविताएँ’ या कवितासंग्रहाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

Tousif Mujawar

हिंमत असेल तर मैदानात या, भाजप आणि शिंदे गटाला उध्दव ठाकरेंचा इशारा

Archana Banage

भारताच्या सेवायज्ञाला जगात तोड नाही : रवींद्र वंजारवाडकर

Tousif Mujawar

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर

Archana Banage

सुषमा अंधारेंचे पती करणार शिंदे गटात प्रवेश

datta jadhav

यंदा 25 ते 30 % इथेनॉलची निर्मिती करणार : शरद पवार

Tousif Mujawar