Tarun Bharat

पुण्यात 5 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त

पुण्यात व्हेल माशाच्या उलटीची (अंबर ग्रीस) तस्करी करणाऱ्या 5 जणांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या उलटीची आंतराष्ट्रीय बाजारपेठेत पाच कोटी रुपये किंमत आहे.

राजेंद्र राकेश कोरडे (वय २८, रा. अजंले ता- दापोली, जि-रत्नागिरी, नवाज अब्दुला कुरुपकर (२४, रा.अडखळ, अंजर्ले, जुईकर मोहल्ला ता. दापोली) अजिम महमुद काजी (५०, रा. अडखळ, अंजर्ले, जुईकर मोहल्ला ता. दापोली), विजय विठ्ठल ठाणगे (५६), अक्षय विजय ठणगे (२६, दोघे रा. चैतन्यनगर, धनकवडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फर्ग्युसन रोडवर काहीजण व्हेल माशाची उलटीविकण्यासाठी येणार असल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला. तीन संशयितांची झडती घेण्यात असली. त्यावेळी राजेंद्र कोरडे यांच्याकडे असेलेल्या काळया रंगाच्या बॅगेत व्हेल माशाच्या उलटीचा २ किलो ९९४ ग्रॅम वजनाचा तुकडा आढळला. त्याची किंमत २ कोटी ९९ लाख ४० हजार आहे. तर दुसरा आरोपी नवाज कुरुपकर याच्या ताब्यात असलेल्या मेहंदी रंगाच्या बॅगेमध्ये आढळलेल्या व्हेल माशाच्या उलटीच्या तुकड्याचे वजन २ किलो २८६ ग्रॅम इतके आणि त्याची किंमत २ कोटी २८ लाख ६० हजार एवढी आहे. तसेच तिसरा आरोपी विजय विठ्ठल ठाणगे याच्याकडील एक दुचाकी (एम.एच १२ एम. के- ९१९३) ताब्यात घेण्यात आली. आरोपींकडून 5 किलो व्हेल माशाचा उलटीचे तुकडे आणि एक दुचाकी असा एकूण ५ कोटी ३५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Related Stories

शोपियां चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा; शोधमोहीम सुरू

datta jadhav

TMC नेत्याच्या घरी आढळल्या ईव्हीएम, व्हीव्हीपॅट

datta jadhav

नाताळसाठी ठाकरे सरकारची नियमावली जाहीर

Tousif Mujawar

सदलापूर येथे तरुणीस चुलत्याकडून मारहाण

Abhijeet Khandekar

कोरोना मुकाबल्यासाठी पाकिस्तान घेणार 150 कोटी डॉलर्सचे कर्ज

datta jadhav

मुख्यमंत्रीपद घालवून मुलाखत घेतायं,लाज वाटते का? नारायण राणेंचा राऊतांवर हल्लाबोल

Abhijeet Khandekar