Tarun Bharat

पुतिन यांचे ब्लॅकबेल्ट रद्द

वृत्तसंस्था/ सेऊल

रशिया आणि युक्रेन यांच्यात सध्या युद्धाची ठिणगी पेटली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांच्या कालावधीत रशियाच्या लष्कराने युक्रेनमधील निष्पाप जनतेवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. रशियन लष्कराच्या या हल्ल्याचा विश्व तायक्वांदो संघटनेने तीव्र शब्दात निषेध करीत त्यांचे ब्लॅकबेल्ट रद्द केले आहे.

2013 नोव्हेंबरमध्ये विश्व तायक्वांदो फेडरेशनतर्फे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना नववे मानद डॅन ब्लॅकबेल्ट प्रदान करण्यात आले होते. पण या फेडरेशनने पुतीन यांचा हा बहुमान काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. विश्व तायक्वांदो स्पर्धेवेळी रशिया किंवा बेलारूसचे राष्ट्रीय ध्वज तसेच राष्ट्रगीत वाजविण्यावर निर्बंध घातले आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सहकार्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. युक्रेनबरोबर युद्ध पुकारल्याने रशियाला आता विविध क्षेत्रामध्ये युरोपियन देशांकडून बंदीला सामोरे जावे लागत आहे.

Related Stories

रत्नागिरी एसटी विभागाला मिळणार 50 नव्या मिनी बस

Patil_p

ताजमहालमध्ये बाँम्ब ठेवल्याची खोटी धमकी, आरोपी ताब्यात

Amit Kulkarni

सैन्यावर पूर्ण विश्वास, नको पुरावा

Patil_p

गुजरातमध्ये विषारी दारूचे 57 बळी

Patil_p

गुणवत्तेची उपेक्षा होऊ नये

Patil_p

नक्षलवादाची व्याप्ती घटली : गृह मंत्रालय

Amit Kulkarni