Tarun Bharat

पुतिन यांच्यावर आयुष्यभर कोणताही खटला चालवता येणार नाही

ऑनलाईन टीम / मॉस्को : 

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर आयुष्यभर कोणताही फौजदारी खटला चालवता येणार नाही. रशियन संसदेचे कनिष्ठ सदन डुमामध्ये यासंदर्भात विधेयक पास झाले आहे.

पुतिन यांनी काही दिवसांपूर्वी जिवंत असेपर्यंत कायदेशीर कारवाईपासून सूट मिळावी, यासाठी विधेयक सादर केले होते. या विधेयकाला जुलै महिन्यात सार्वमताव्दारे मंजुरी दिली गेली होती. मंगळवारी डुमात पहिल्यांदा हे विधेयक पारित केले गेले. अजून दोन वेळा हे विधेयक डुमात मांडले जाईल. त्यानंतर हे विधेयक फेडरेशन काऊन्सिल म्हणजे संसदेच्या वरिष्ठ सदनात जाईल. त्यानंतर पुतिन त्यावर स्वाक्षरी करतील.

पुतिन सन 2000 पासून रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. यांचा कार्यकाळ 2024 ला पूर्ण होणार आहे. मात्र, घटनादुरुस्त्यांमुळे त्यांना आपला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही दोन टर्म म्हणजेच 12 वर्ष राष्ट्राध्यक्ष पदावर राहाता येणार आहे.

Related Stories

Pegasus Spyware : नाना पटोलेंचाही फोन टॅप झाला होता, बाळासाहेब थोरातांचा गंभीर आरोप

Archana Banage

असदुद्दीन ओवेसी यांच्या ताफ्यावर हल्ला

Abhijeet Khandekar

९०० कर्मचाऱ्यांना बेरोजगार करणाऱ्या भारतीय सीईओंना दिली ‘सुट्टी’

Archana Banage

ब्रिटनमध्ये चिनी एलईडी लाइट्सद्वारे हेरगिरी

Patil_p

‘गौतम गंभीर फाऊंडेशन’ औषधांच्या अवैध साठेबाजी प्रकरणात दोषी : ड्रग्ज कंट्रोलर

Tousif Mujawar

“रूंजी”चा अपघाती मृत्यू; मनाला “चटका” लावून गेला !

Abhijeet Khandekar