Tarun Bharat

पुतीन यांना सतावतेय हत्येची भीती

सुमारे 1000 कर्मचाऱयांना नोकरीतून हटविले

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनी स्वतःच्या पर्सनल स्टाफमधील सुमारे 1 हजार सदस्यांना हटविले आहे. हे कर्मचारी विषप्रयोग करतील, अशी भीती पुतीन यांना होता. हटविण्यात आलेल्या कर्मचाऱयांमध्ये सुरक्षारक्षक, कुक, कपडय़ांची व्यवस्था सांभाळणारे आणि वैयक्तिक सचिव सामील आहेत. या सर्वांना फेब्रुवारी महिन्यात हटविण्यात आले होते. हटविण्यात आलेल्या लोकांच्या जागी ज्यांना नेमण्यात आले आहे, त्यांची पूर्ण चौकशी करण्यात आली आहे. पुतीन यांच्या आदेशानंतर रशियाच्या सैन्याने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला केला होता. युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशिया आणि त्याच्या सहकाऱयांवर जगभरातून कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत.

अमेरिकेचे खासदार लिंडसे ग्रॅहम यांनी रशियाच्या राष्ट्रपतींची हत्या होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ग्रॅहम यांनी यापूर्वी पुतीन यांची तुलना ऍडोल्फ हिटलरसोबत केली होती. युद्ध संपविण्याची एकमात्र पद्धत म्हणजे पुतीन यांची हत्या करणे असल्याचे ग्रॅहम यांनी म्हटले होते. पुतीन यांना विष देण्याचे काम कुठले विदेशी सरकारकडून केले जाणार नाही. क्रेमलिनमधूनच याचा प्रयत्न होणार असल्याचे ग्रॅहम म्हणाले होते. रशियाचा गुप्तचर विभाग विषप्रयोगासाठी कुप्रसिद्ध आहे. विष देण्याच्या घटनांना पूर्वीपासून क्रेमलिनशी जोडून पाहिले जाते. क्रेमलिनच्या टीकाकारांना नर्व्ह एजंट नोविचिक देण्यात येत होते. पुतीन यांचे सर्वात मोठे टीकाकार एलेक्सी नवालनी यांना ऑगस्ट 2020 मध्ये नोविचिक देण्यात आले होते, परंतु उपचार मिळाल्याने ते वाचले होते. नवालनी सध्या रशियाच्या एका तुरुंगात कैद आहेत. नवालनी यांनी युक्रेन युद्धाला विरोध दर्शविला आहे.

Related Stories

दीपिकाचे आव्हान संपुष्टात

datta jadhav

अफगाण सरकारची बँक खाती सील

datta jadhav

युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क यादीत श्रीनगर सामील

Patil_p

श्रीलंकन नागरिकाची पाकिस्तानी जमावाकडून हत्या

Patil_p

ब्रिटनने महात्मा गांधींच्या स्मृतीप्रित्यर्थ सादर केले नवे नाणे

Patil_p

स्पेनमध्ये निदर्शने

Patil_p