Tarun Bharat

पुनम पांडे हिच्याकडून गोव्याच्या बदनामीचा प्रकार

प्रतिनिधी/ मडगाव

काणकोण तालुक्यातील चापोली धरणावर अश्लिल व्हिडिओ चित्रिकरण केल्याप्रकरणी अभिनेत्री पुनम पांडेच्या विरोधात ‘बायलांचो एकवोट’च्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती आवदा व्हियेगस यांनी दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे.

पूर्ण नग्न व अर्ध नग्न अवस्थेत अभिनेत्री पुनम पांडे हिने चापोली धरणावर व्हिडिओ चित्रित केलेला आहे. हा व्हिडिओ गोवा तसेच गोव्याबाहेर समाज माध्यमांवरून प्रसारित झाल्याने, गोव्याबद्दल अत्यंत चुकीची जाहिरात केली जात असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. अश्लिल चित्रिकरणाला ज्यांनी मान्यता दिली ते पाहून आपण गोंधळून गेल्याचे श्रीमती व्हियेगस यांनी म्हटले आहे.

गोवा हे सुंदर राज्य आहे. याठिकाणी अश्लिलतेला वाव नाही. कायद्याने देखील गोव्यात नग्नतेवर बंदी घातलेली आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्री पुनम पांडे हिने अश्लिल व्हिडिओचे चित्रिकरण करून ते समाज माध्यमांवर घातल्याने गोवेकरांची मान शर्मेने खाली गेली आहे. काणकोण पोलिसांनी स्वाधिकाराने या प्रकरणाची दखल घेऊन पुनम पांडेच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या 292 आणि 293 कलमाखाली कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

चापोली धरणावर अश्लिल व्हिडिओचे चित्रिकरण करण्यास ज्यांनी मान्यता दिली, त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई करावी अशी मागणी बायलांचो एकवोटतर्फे करण्यात आली आहे.

Related Stories

शिवोली येथे दिड लाखाचा ड्रग्ज जप्त

Amit Kulkarni

निर्मला सीतारामन आज गोव्यात

Amit Kulkarni

सामाजिक कार्यकर्ते वायंगणकर यांना देण्यात आलेली धमकी राजकीय हेतूने : जोजफ सिक्वेरा

Amit Kulkarni

सत्तरी तालुक्मयाला पावसाने झोडपले

Amit Kulkarni

आंचिममध्ये दिसणार अर्जेंटिना टँगो

Patil_p

जिल्हा पंचायतींना भरघोस वाढीव निधी

Omkar B