Tarun Bharat

पुनित बिस्तचा सर्वाधिक 17 षटकारांचा विक्रम

Advertisements

वृत्तसंस्था/ चेन्नई

सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 लीग स्पर्धेतील गुरूवारी येथे झालेल्या प्लेट गटातील सामन्यात मेघालयने मिझोरामचा 130 धावांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यात मेघालय संघाचा कर्णधार पुनित बिस्तने टी-20 प्रकारात भारतातर्फे सर्वाधिक षटकारांचा विक्रम केला आहे. त्याने या सामन्यात 51 चेंडूत 17 षटकार आणि 6 चौकारांसह 146 धावा झोडपल्या.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मेघालयने 20 षटकांत 6 बाद 230 धावा जमविल्या. कर्णधार बिस्तने 51 चेंडूत नाबाद 146 धावांची खेळी केली. योगेश तिवारीने 53 धावा झळकविल्या. त्यानंतर मिझोरामने 20 षटकांत 9 बाद 100 धावा जमविल्याने त्यांना हा सामना 130 धावांनी गमवावा लागला. मिझोरामच्या डावात पवनने 33, प्रतिक देसाईने 27 धावा केल्या. मेघालयतर्फे सिंघानियाने 15 धावांत 4 गडी बाद केले.

या सामन्यात मेघालयला 4 गुण मिळाले. टी-20 प्रकारात विंडीजचा सलामीचा फलंदाज ख्रिस गेलने बांगलादेश प्रिमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत रंगपूर रायडर्स संघाकडून खेळताना सर्वाधिक षटकारांचा विक्रम केला आहे. या सामन्यात बिस्तने पहिले अर्धशतक 26 चेंडूत तर त्यानंतर पुढील 94 धावा केवळ 25 चेंडूत नोंदविल्या. बिस्तने तिवारीसमवेत तिसऱया गडय़ासाठी 10 षटकांत 120 धावांची भागिदारी केली.

या स्पर्धेतील अन्य सामन्यात बिहारने सिक्कीमचा 8 गडय़ांनी पराभव केला. बिहारचा हा सलग दुसरा विजय आहे. तसेच चंदीगड आणि नागालँड यांनीही आपले विजय नोंदविले. प्लेट विभागात बिहारचा संघ 8 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. चंदीगड दुसऱया तर नागालँड तिसऱया स्थानावर आहे.

संक्षिप्त धावफलक

मेघालय 20 षटकांत 6 बाद 230 (बिस्त नाबाद 146, तिवारी 53), मिझोराम 20 षटकांत 9 बाद 100.

अरूणाचल प्रदेश 20 षटकांत 7 बाद 145, नागालँड 15.5 षटकांत 1 बाद 147

सिक्कीम 20 षटकांत 8 बाद 110, बिहार 19.1 षटकांत 2 बाद 111

चंदीगड 20 षटकांत 5 बाद 178, मणीपूर 20 षटकांत 8 बाद 66.

Related Stories

अमित रोहिदासकडेच नेतृत्व, नीलमचे पुनरागमन

Patil_p

भारतीय महिला क्रिकेट संघासमोर मोठे आव्हान

Amit Kulkarni

ऑलिंपिकला जाणाऱया ऍथलीट्ससाठी गटागटाने सरावाची योजना

Amit Kulkarni

टी-20 मालिकेत न्यूझीलंडची विजयी आघाडी

Patil_p

सायनाने निवड चाचणी स्पर्धेला वगळले

Patil_p

नॉर्वेचा कास्पर रूड विजेता

Patil_p
error: Content is protected !!