Tarun Bharat

पुनीत राजकुमारच्या चाहत्याने केली आत्महत्या; स्टारच्या मृत्यूमुळे बसला होता धक्का

बेंगळूर / प्रतिनिधी

बन्नेरघाटाजवळील शानुभोगनाहल्ली येथे रविवारी सायंकाळी ४० वर्षीय पुनीत राजकुमारच्या चाहत्याने राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. पीडित राजेंद्रच्या कुटुंबीयांनी त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचे डोळे दान केले. पेशाने विणकर असलेला राजेंद्र याने पुनीत राजकुमार यांच्या आकस्मिक निधनाच्या बातम्या टीव्हीवर पाहून टोकाचे पाऊल उचलले, असे पोलिसांनी सांगितले.

राजेंद्र आपल्या आवडत्या स्टारच्या निधनाने अस्वस्थ होता, शनिवारी संध्याकाळपासून पुनीत राजकुमारच्या मृत्यूच्या बातम्या सतत पाहत होता. त्यांनी पत्नी आणि आईला सांगितले होते की, त्यांनी वर्षभरापूर्वी नेत्रदानासाठी साइन अप केले होते आणि त्यांचा मृत्यू झाल्यास पुनीतप्रमाणे त्यांचे नेत्रदान करण्याची विनंती केली होती.

राजेंद्रने पुनीतच्या मृत्यूचे लाईव्ह कव्हरेज पाहिले. रविवारी सकाळी अभिनेत्याचा अंतिम संस्कार होईपर्यंत आणि त्यानंतरही तो टीव्ही पाहत राहिला. त्याची आई आणि पत्नी कपडे धुण्यासाठी बाहेर गेल्यावर राजेंद्रने आपल्या खोलीत जाऊन गळफास लावून घेतला. सायंकाळी सात वाजता दोन्ही महिला घरी परतल्या असता मृतदेह आढळून आला. राजेंद्रच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, त्याला पुनीतसारखे डोळे दान करायचे आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्याचा मृतदेह व्हिक्टोरिया रुग्णालयात हलवला जेथे नारायण नेत्रालयातील डॉक्टरांनी त्याचे डोळे काढले. बन्नेरघट्टा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

Related Stories

कर्नाटक राज्य पाणीपुरवठा मंडळाचे निवृत्त अभियंता प्रसन्न मूर्ती यांचे निधन

Tousif Mujawar

खानापूरला एकाच दिवशी 82 दावे निकाली

Amit Kulkarni

रसिकरंजनतर्फे आज ‘ओ दूर के मुसाफीर’ कार्यक्रम

Patil_p

मला पंतप्रधान जरी केले तरी मी भाजपबरोबर जाणार नाही : सिद्धरामय्या

Abhijeet Khandekar

खानापुरात वटवृक्षाची मनोभावे पूजा

Amit Kulkarni

रविवारी रन फॉर उत्सव मॅरेथॉनचे आयोजन

Amit Kulkarni