Tarun Bharat

पुन्हा बायोमायंनिग प्रकल्प वादाच्या भोवऱयात

प्रतिनिधी/ सातारा

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सातारा पालिकेचा बायोमायंनिग प्रकल्प गेल्या कित्येक दिवसापासून खितपत पडलेला आहे. या प्रकल्पाचे काम 25 टक्के सुद्धा पूर्ण नाही तोच काहीही करून ठेकेदाराचे पहिले बिल अदा करण्याच्या खटपटी सुरू झाल्या. सद्या कोरोनाकडे सगळे व्यस्त असल्याने सारे कुरण मोकळे झालेले आहे. त्यामुळे गेल्या आठवडय़ात बिल काढण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. त्याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारही केलेली आहे. त्यामुळे बायोमायनिंग प्रकल्प पुन्हा वादाच्या भोवऱयात अडकणार आहे.

सातारा शहरातील दररोज तयार होणारा सुमारे सहा टन कचरा गोळा करून त्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प सातारा पालिकेने प्रस्तावित केला होता. त्या प्रकल्पाचे कामही सुरू झाले. मात्र मध्येच हे काम रेंगाळले गेले. केवळ 25 टक्केच काम झाल्याचे दिसत असून अनेक बाबी अजूनही तशाच आहेत. प्लास्टिक वेगळे करणे प्लास्टिकवर प्रक्रिया करणे या मशनरी केवळ बसवण्यात आलेले आहेत. त्या मशनीवर प्रक्रिया मात्र नावालाच होत आहे. प्रशासनाने गांभीर्याने घ्यायला हवे मात्र याकडे दुर्लक्ष होत असून काम चांगले होण्याऐवजी बिल काढण्यावर भर दिसतं आहे. बायोमायनिंग हा प्रकल्प सुमारे सहा कोटी हून अधिक रकमेचा आहे. यातील एक कोटी 25 लाखाचे बिल गेल्या आठवडय़ात काढल्याचे पालिकेत चर्चा आहे तर आणखी नवलाखा चे बिल काढण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे बायो मायनिंग प्रकल्प अजूनही पूर्ण झाला नसताना बिल काढण्याची खटपटी नेमक्या कशासाठी आहेत. यामध्ये नेमके कोणाचे हात ओले झालेले आहेत. अशी चर्चा सुरू या गोड बंगाला विरोधात सामाजिक कार्यकर्ते आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. सोनगाव कचरा डेपोत कचरा उघडय़ावरच सातारा शहरातील दररोज गोळा होणारा कचरा वास्तविक एकत्रच गोळा करून नेला जात आहे तो सोनगाव कचरा डेपोत टाकला जात आहे. मात्र हा कचरा डेपोच्या बाहेर येत असल्याने परिसरातील नागरिकांना हे दृश्य केविलवाणे वाटत आहे. पालिका प्रशासनाने हा कचरा किमान आतमध्ये तरी टाकण्याची तजवीज करावी अशी मागणी होऊ लागलेले आहे

Related Stories

अजित पवारांच्या सभेत प्रचंड गर्दी; भाजप नेत्यांकडून कारवाईची मागणी

Archana Banage

चोरून आणलेल्या वीट, साहित्यावर सुरू आहे बंगल्याचे बांधकाम

Patil_p

Maratha Kranti Morcha:हाताला सलाईनची सुई असलेला धैर्यशील मानेंचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Archana Banage

शालेय पोषण आहारातून खिचडी वगळणार

datta jadhav

…अन् लॅपटॉप भेट देत छोट्या सर्वेशचे स्वप्न राहुल गांधींनी साकारले

Archana Banage

शाहूपुरीत 2 दुकाने फोडून 12 हजारांची रोकड लांबवली

Patil_p