Tarun Bharat

पुन्हा रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागाला जिल्हाधिकाऱयांची सक्त ताकीद

निर्बंधित प्रदेशात आरोग्य तपासणीबरोबर स्वच्छता राखण्याची सूचना

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जिल्हय़ामध्ये 41 वर गेली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी पुन्हा तातडीने व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आरोग्य अधिकारी, तहसीलदार यांना लक्ष देण्याची सक्त ताकीद केली आहे. कोरोना रुग्ण सापडलेल्या निर्बंधित प्रदेशातील कुटुंबांची माहिती जमा करून त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी दिली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनही हतबल झाले आहे. गुरुवारी एकाच दिवशी जिल्हय़ात 17 रुग्ण आढळले. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा पाच रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक घरात जाऊन सर्व्हे करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे. आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका यांना सर्व्हे करताना मास्क तसेच सॅनिटायझर द्या, असे त्यांनी सांगितले आहे.

क्वारंटाईन रुग्णांना काही लॉजमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांची सर्व ती काळजी जिल्हा प्रशासनाच्यावतीने घेण्यात आली आहे. असे असले तरी काही वृत्तपत्रे चुकीच्या बातम्या देत आहेत. त्याबद्दलही या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये चर्चा झाली आहे. जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र के. व्ही. यांनी ज्या रुग्णांना ताप, सर्दी, खोकला झाला आहे, त्यांची यादी तयार करा. याचबरोबर त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करा, अशी सक्त ताकीद त्यांनी दिली आहे. ज्या परिसरात कायद्याचे उल्लंघन होत आहे, त्या परिसरात अधिक लक्ष द्या, असे पोलिसांनाही यावेळी सांगण्यात आले.

Related Stories

गतिरोधकांसाठी चक्क शिक्षक रस्त्यावर उतरले

Rohit Salunke

मराठा बँकेतर्फे शिवराज्याभिषेक दिन साजरा

Patil_p

हणमापूर क्रॉसजवळ 30 किलो चंदन जप्त

Amit Kulkarni

न्यायालयाच्या निकालामुळे सौहार्द सहकारी करमुक्त

Patil_p

काकती श्री सिद्धेश्वर यात्रेला परवानगी द्या

Amit Kulkarni

बोडकेनहट्टी येथील काळम्मादेवी मंदिरात चोरी

Amit Kulkarni