Tarun Bharat

पुन्हा हिंदवी स्वराज्याची स्थापना व्हावी

प्रतिनिधी/ सातारा

हिदंवी स्वराज्य हे खऱया अर्थाने धर्माचे व प्रजेचे रक्षण करणारे स्वराज्य होते. या स्वराजाची पुर्नस्थापना व्हावी यासाठी आम्ही भारतभर धर्मजागरण करत फिरत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दौरे सध्या सुरु असून हिंदवी राष्ट्र पुन्हा आणण्यासाठी प्रत्येक युवकांमध्ये प्रत्येक हिंदुंमध्ये धर्माभिमान कसा जागृत होईल आणि भक्तीच्या मार्गावर प्रत्येक हिंदु कसा येऊ शकेल, यासाठी सर्व हिंदूंनी कार्यरत राहिले पाहिजे, अशी अपेक्षा कालीपुत्र कालीचरण महाराजांनी व्यक्त केली.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या विनंतीवरुन कालीचरण महाराज सातारा जिल्हय़ाच्या दौऱयावर आले असून या दौऱयात ते धर्मजागरण करणार आहेत. सातारा शहरात विविध हिंदुत्ववादी संघटनांनी आणि सातारकर नागरिकांनी कोरोनाचे निर्बंध पाळून जोरात त्यांचे जोरदार स्वागत केले. काली महाराजांचा सध्या धर्मजागरणाचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरु आहे.

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या माध्यमातून संघटनेचे सर्व युवा सहकारी महाराजांच्या दौऱयाचे नियोजन करत आहेत. श्री शिवप्रतिष्ठान युवा हिन्दुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले सुद्धा कालीचरण महाराजांसोबत उपस्थित होते. खंडाळा आणि वाई दौरा झाल्यानंतर कालीचरण महाराजांचे सोमवारी साताऱयात धुमधडाक्यात आगमन झाले.

शहरात येतानाच बॉम्बे रेस्टॉरंट चौकात धर्मजागरणचे गणेश मेळवणेंच्या हस्ते त्यांचे स्वागत झाले. तेथून महाराज विसाव्या नाक्यावर थोडा कालावधी पैलवान पानशॉप येथे विसावले. तिथे त्यांनी पैलवान ऋषीराज कणसे आणि समस्त हिंदुत्ववाद्यांकडून सत्कार स्वीकारला.

तेथून पुढे जलमंदिराकडे प्रस्थान होत असताना वाटेत पोवईनाक्यावर सेल्फी पॉईंटच्या इथे सातारकरांकडून महाराजांनी सत्कार स्वीकारला. शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन जलमंदिराकडे रवाना झाले. यावेळी त्यांनी सयाजी हायस्कूल, मारवाडी चौक, गोलबाग येथे प्रतिष्ठीत नागरिकांकडून सत्कार स्वीकारला.  

जलमंदिरात तुळजाभवानीची आरती

जलमंदिरात महाराजांच्या स्वागतासाठी छत्रपती उदयनराजे सहपरिवार उपस्थित होते. तिथे कालीचरण महाराज आणि खासदार उदयनराजे यांच्यात तीन तास चर्चा झाली. त्यानंतर श्री. छ. राजमाता कल्पनराजे भोसले यांच्या उपस्थितीत जलमंदिरातील तुळजाभवानी मंदिरात आरती करुन छत्रपती घराण्याचा निरोप घेऊन कालीचरण महाराज पुन्हा पुढच्या दौऱयासाठी रवाना झाले. त्यांचा सातारा दौरा यशस्वी करण्यासाठी शिवप्रतिष्ठान युवा हिन्दुस्थानचे युवा सहकारी ऋषीराज कणसे, ओंकार डोंगरे, गणेश शिंदे आणि असंख्य युवा सहकारी यांनी परिश्रम घेतले.

Related Stories

सातारा जिल्ह्यात 1280 नागरिकांना दिला डिस्चार्ज

Archana Banage

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड वसुल

Patil_p

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांच्या अडचणीत वाढ, खंडणीप्रकरणी लूकआऊट नोटीस

Archana Banage

कण्हेर योजनेचे पाणी शाहुपूरीकरांच्या घरात लवकरच

Patil_p

‘जनआक्रोश’ यात्रेपूर्वी ताब्यात घेतलेल्या भाजप नेते राम कदम यांची पोलिसांकडून सुटका

Tousif Mujawar

सातारा तालुका पुन्हा पाचशे पार

Amit Kulkarni