Tarun Bharat

पुरलेल्या मृतदेहाची अदलाबदल ?

प्रतिनिधी/ मडगाव

इंग्लंडहून शिप्पींग कंपनीने पाठविलेल्या शवपेटीचा रंग आणि दिल्लीहून गोव्यात आलेल्या शवपेटीचा रंग वेगवेगळा असल्यामुळे दफन केलेला मृतदेह हा आपल्याच मुलाचा का अशी शंका येत असून त्यासंबंधी खात्री करण्यासाठी दफन केलेला मृतदेह उकरुन काढण्यास परवानगी द्यावी म्हणून बोर्डा – मडगाव येथील मयत ग्लेन पेरैरा यांचे वडिल फ्रान्सिस्का पेरैरा यांनी प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे.

या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की ग्लेन पेरैरा हा विदेशी जहाजावर काम करीत होता. 8 एप्रिल 2020 रोजी त्याला इंग्लंडमध्ये  मृत्यू आला. ताप आल्याने आणि हृदय विकाऱयाच्या झटक्याने ग्लेन याला मृत्यू आल्याचे शिप्पींग कंपनीने मयताच्या घरी कळविले होते. मृत्यूच्या एक दिवस अगोदर त्याने आपल्या आईकडे संपर्क साधून बोलणीही केली होती.

1 जुलै 2020 रोजी सदर मृतदेह दिल्लीला आणि 3 जुलै 2020 रोजी मृतदेह गोव्यात पोहोचला. मृतदेह बोर्डा येथे मयताच्या घरी नेण्यात आला आणि त्यानंतर लगेच मृतदेह मडगावातील होली स्पिरीट चर्च दफनभुमीत नेण्यात आला आणि दफन करण्यात आले.

शवपेटी गोव्यात आली तेव्हा ती उघडण्यात आलेली नव्हती. परिणामी मृतदेह ग्लेन पेरैरा याचाच का याची खात्री होऊ शकली नव्हती. मृतदेहाचे दफन केल्यानंतर मयताच्या कुटूंबात अनेक सवाल निर्माण झाले असे दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱयांना सादर केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

 ग्लेन परैरा याला कारण ताप आल्याने आणि हृदय विकाराचा झटका आल्याने मृत्यू आला असे इंग्लंडच्या इस्पितळातून आलेल्या पहिल्या वैद्यकीय अहवालात म्हटले होते. हा अहवाल शिप्पींग कंपनीने मयताच्या घरी पाठवला होता. मात्र नवी दिल्लीहून आलेल्या अहवालात ग्लेन पैरैरा याला कोवीड-19 रोगामुळे मृत्यू आला असे नमूद करण्यात आले असल्याचे दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱयांना सादर केलेल्या निवेदनात मयताच्या वडिलांनी म्हटलेले आहे.

शिप्पींग कंपनीने शवपेटीचे छायाचित्र पाठविले होते. त्यात शवपेटीचा रंग पिवळा होता. मात्र नवी दिल्लीहून गोव्यात आलेल्या शवपेटीचा रंग काळा होता.  शवपेटीचा रंग पिवळा होता तो काळा कसा झाला? शवपेटी बदलण्याचे कारण काय? की दफन केलेला मृतदेह ग्लेन पेरैरा याचा नव्हे? असे सवाल मनात येत आहेत.

या पार्श्वभूमीवर सदर मृतदेह ग्लेन पेरैरा याचा की आणखी कोणाचा याची खात्री करण्यासाठी आणि आमच्या मनातील शंका दूर करण्यासाठी पुरलेला मृतदेह उकरुन काढण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी विनंती या निवेदनातर्फे दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱयांना केली आहे.

मयत पेरैरा याला कोरोना झाला असल्याचे नमूद केल्यामुळे सध्या मयताच्या कुटूंबाना सध्या अनेक सामाजीक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे त्याचबरोबर जर मृत्यू कोरोनामुळेच झाला तर दफन केलेला मृतदेह पुन्हा उकरुन काढता येतो का असे सवाल निर्माण झाले आहेत.

Related Stories

माशेल येथे हेल्थमेट होमिओपॅथीतर्फे मधुमेह तपासणी शिबिर उत्साहात

Amit Kulkarni

महाविद्यालयांच्या परीक्षा रद्द

Omkar B

दिवाडी शक्तिविनायक देवस्थानचा आजपासून वर्धापन सोहळा

tarunbharat

रहिवासी दाखले वेळेवर मिळत नसल्याने सत्तरीच्या विद्यार्थी, नागरिकांना जबरदस्त फटका.

Amit Kulkarni

अ.भा.मराठी कवी संमेलनात रमेश वंसकर यांचा सहभाग

Amit Kulkarni

वीज केबल चोरी प्रकरणी दोघांना अटक

Amit Kulkarni