Tarun Bharat

पुराच्या पाण्यात दुचाकी घालणे पडले महागात

बुडालेल्या पाच जणांना वाचविण्यात यश तर एक मृत्यू

वार्ताहर / खंडेराजूरी

मल्लेवाडी (ता. मिरज) येथे बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने गाव ओढा आणि आडव्या ओढय़ाला आलेल्या पुरात सहा जण वाहून गेले. पूराच्या पाण्यात मोटारसायकली घालणे त्यांना महागात पडले. यापैकी पाच जणांना वाचविण्यात यश आले. तर जयश्री संजय दरुरे (वय 40) ही महिला वाहून गेल्याने तिचा मृत्यू झाला. दरम्यान, मिरज पूर्व भागातील बेळंकी, एरंडोली, टाकळी, मल्लेवाडी येथील सर्व ओढे दुथडी भरुन वाहत आहेत.

बुधवारी दिवस आणि रात्रभर मुसळधार पाऊस पडल्याने पूर्व भागातील सर्व ओढे-नाल्यांना पूर आला आहे. या पूराने मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी रात्री मल्लेवाडीजवळील आडवा ओढा ओलांडताना एक मोटारसायकल स्वार पाण्याच्या प्रवाहात पडला. त्याने कसाबसा जीव वाचविला. मात्र, त्याची मोटारसायकल वाहून गेली. तसेच मल्लेवाडी येथील संजय धनपाल दरुरे (वय 48) आणि जयश्री संजय दरुरे हे दाम्पत्य बुधवारी कामानिमित्त मिरजेत आले होते.

मात्र, दिवसभर पडलेल्या पावसाने ओढय़ाला पूर आल्याचे समजाच त्यांनी मालगाव येथे पाहुण्यांकडे मुक्काम केला. गुरूवारी सकाळी ते गावाकडे निघाले. पण, गावओढय़ाला प्रचंड पूर आला होता. ते दर्ग्याजवळ असणाऱया घराकडे निघाले होते. संजय दरुरे यांनी पाण्याच्या प्रवाहात मोटारसाकल घातली. मात्र, प्रवाहामुळे ते वाहून जावू लागले. आसपासच्या ग्रामस्थांनी दरुरे दाम्पत्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संजय दरुरे यांना वाचविण्यात आले. त्यांची पत्नी जयश्री या वाहून गेल्या. दुपारी त्यांचा मृतदेह मिळाला. तर याच ओढय़ाच्या पाण्यातून धोंडीराम लालासाहेब शिंदे हे वृध्द निघाले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने तेही वाहून गेले. मात्र, त्यांना ग्रामस्थांनी वाचविले.

मल्लेवाडी येथील आडव्या ओढा बेळंकी येथील एका व्यक्तीने पुराच्या पाण्यातून पार मोटारसायकलीवरुन पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो गाडीसह वाहून गेला. मात्र, त्याला पोहता येत असल्याने तो बाहेर आला. त्याची मोटारसायकल वाहून गेली.

Related Stories

जत तालुक्यातील 110 होमगार्ड मतदानापासून राहणार वंचित

Archana Banage

सांगली : शस्त्राचा धाक दाखवून अडीच लाखाचा ऐवज लंपास

Archana Banage

गुंड भावश्या पाटलावर आरोप निश्चित

Archana Banage

विशेष लेखापरीक्षक लाखाची लाच घेताना अटकेत

Archana Banage

सांगली : नरवाड येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Archana Banage

शिक्षक बँकेने मयत शिक्षकांच्या अंत्यसंस्कार निधीत वाढ करावी: सौदागर

Archana Banage
error: Content is protected !!