Tarun Bharat

पुरुषांच्या 100 मी. बॅकस्ट्रोकचे रिलोव्हला सुवर्ण

कोलेस्निकोव्ह, मर्फीसारख्या दिग्गज प्रतिस्पर्ध्यांवर मात, पहिली दोन्ही पदके रशियाकडे

पुरुषांच्या 100 मीटर्स बॅकस्ट्रोक फायनलमध्ये रशियाचे रिलोव्ह व कोलेस्निकोव्ह यांनी यांनी अनुक्रमे पहिली दोन पदके जिंकत हा इव्हेंट गाजवला. रिलोव्ह सुवर्ण तर कोलेस्निकोव्ह रौप्यपदकाचा मानकरी ठरला.

या इव्हेंटमधील 2 फेवरीट मर्फी व कोलेस्निकोव्ह यांनी पहिल्या 25 मीटर्समध्ये जोरदार सुरुवात केली होती. या दोघात आणि अन्य प्रतिस्पर्ध्यात यावेळी बरेच अंतर होते. 50 मीटर्सच्या मार्कला कोलेस्निकोव्ह आघाडीवर तर मर्फी तिसऱया स्थानी होता. मात्र, या इव्हेंटच्या अंतिम क्षणी सारे चित्र बदलून गेले.

इवगेनी रिलोव्हने सर्व अनुभव पणाला लावत अवघ्या 0.02 सेकंद फरकाने सुवर्णपदक काबीज केले आणि त्याचा राष्ट्रीय सहकारी कोलेस्निकोव्ह दुसऱया स्थानासह रौप्यपदकाचा मानकरी ठरला. वर्ल्ड रेकॉर्ड आणि ऑलिम्पिक रेकॉर्ड होल्डर रियान मर्फी तिसऱया स्थानी आला. त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

Related Stories

लंकेचा क्रिकेटपटू झोयसा दोषी

Patil_p

मोटो शर्यतीतील दुर्घटनेत स्वीसचा चालक ठार

Patil_p

दक्षिण कोरियाची महिला गोल्फपटू किम जू विजेती

Patil_p

श्रेयस अय्यरच्या वनडेमध्ये जलद 1500 धावा

Amit Kulkarni

इंग्लंडला 130 धावांची आघाडी, जो रूटचे झुंजार द्विशतक

Patil_p

टी-10 क्रिकेट ऑलिम्पिकसाठी योग्य

Patil_p