Tarun Bharat

पुरुष दुहेरीत भारताला दोन कांस्यपदके

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

शरथ कमल व जी. साथियान तसेच हरमीत देसाई व मानव ठक्कर या दोन भारतीय जोडय़ांनी आयटीटीएफ एटीटीयू आशियाई टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये पुरुष दुहेरीत कांस्यपदके पटकावली.

पहिल्या उपांत्य लढतीत आठव्या मानांकित हरमीत व मानव ठक्कर यांनी दक्षिण कोरियाची पाचवी मानांकित जोडी वूजिन जँग व जाँगहून लिम यांना कडवी झुंज दिली. पण अखेर कोरियन जोडीने 4-11, 6-11, 12-10, 11-9, 8-11 असा 44 मिनिटांत विजय मिळवित अंतिम फेरी गाठली. सहाव्या मानांकित शरथ व साथियान यांना जपानच्या युकिया उदा व शुनसुके टोगामी यांच्याकडून 33 मिनिटांत 5-11, 9-11, 11-13 असा पराभव स्वीकारावा लागला. भारतीय खेळाडूंचा पराभव झाला असला तरी आशियाई चॅम्पियनशिपमध्ये नवा इतिहास रचताना गेल्या आठवडय़ात भारताने सांघिक कांस्यपदक मिळविले. त्यानंतर सोमवारी पुरुष दुहेरीच्या दोन जोडय़ांनी त्यात आणखी दोन कांस्यपदकांची भर घातली आहे.

हरमीत व मानव 0-2 अशा गेम्सनी पिछाडीवर पडल्यानंतर त्यांचे आव्हान संपुष्टात आल्यातच जमा होते. पण तिसऱया गेममध्ये दोघांनी आपला खेळ उंचावला आणि प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणले. 7-7 नंतर त्यांनी 10-10 अशी बरोबरी साधत हा गेम शेवटी 12-10 असा भारतीय जोडीने घेतला. गेम जिंकल्याने आत्मविश्वास वाढल्यामुळे चौथ्या गेममध्येही त्यांनी शानदार खेळ केला. 5-5 अशा बरोबरीनंतर त्यांनी 8-5 अशी आघाडी घेतली. कोरियन जोडीने त्यांना 9-9 वर गाठले असले तरी भारतीय जोडीने हा गेम 11-9 असा घेत बरोबरी साधली. निर्णायक पाचव्या गेममध्ये भारतीय जोडी 6-4 असे पुढे होती. पण कोरियन जोडीने त्यांना 6-6 वर गाठले आणि नंतर अनुभवी कोरियन जोडीने खेळ उंचावत गेमसह अंतिम फेरीतील स्थानही निश्चित केले.

शरथ व साथियान यांनी जपानच्या जोडीला चांगली टक्कर दिली. पहिले दोन गेम गमविल्यानंतर तिसऱया गेममध्ये तर 4-2 अशी बढतही घेतली होती. जपानच्या जोडीने त्यांना 6-6 वर गाठले व नंतर 10-7 अशी आघाडी घेतल्यावर शरथ-साथियान यांनी त्यांना 11-11 वर गाठले. पण जपानी जोडीने नंतर गेम जिंकून अंतिम फेरी गाठली.

Related Stories

इश्फाक अहमद केरळ ब्लास्टर्ससे हंगामी प्रशिक्षक

Patil_p

ऑलिम्पिक टॉर्च रिलेचा मात्सुयामातील टप्पा रद्द

Patil_p

के. श्रीकांत, त्रीसा-गोपीचंद उपांत्य फेरीत

Patil_p

अय्यरला आयपीएलचा पहिला टप्पा हुकण्याची शक्यता

Amit Kulkarni

झिम्बाब्वेचा टेलर निवृत्त

Patil_p

ना भारत जिंकला, ना न्यूझीलंड हरले!

Patil_p