Tarun Bharat

पुरुष सांघिक तिरंदाजीत दक्षिण कोरिया विजेते

Advertisements

अंतिम फेरीत चायनीज तैपेईवर 6-0 फरकाने एकतर्फी मात

दक्षिण कोरियन संघाने सोमवारी पुरुष तिरंदाजीचे सुवर्ण जिंकले. त्यांनी अंतिम फेरीत चायनीज तैपेईचा 6-0 अशा एकतर्फी फरकाने फडशा पाडला. 17 वर्षीय किम जे-डेओकने दमदार प्रदर्शन साकारत यात मोलाचा वाटा उचलला.

प्रारंभी, त्याने यजमान जपानविरुद्ध उपांत्य फेरीत एकहाती विजय मिळवून दिला आणि त्यानंतर युमेनोशिमा पार्क फिल्डमध्ये तैवानवर 6-0 असा दमदार विजय संपादन केला.

‘संघ ज्यावेळी अडचणीत असतो, त्यावेळी किम जे-डेओक निश्चितपणाने संघाच्या मदतीला धावून येतो. या ऑलिम्पिकमध्येही त्याची प्रचिती आली’, असे कोरियन संघातील अनुभवी सहकारी 39 वर्षीय ओह जिन-हिएकने नमूद केले.

टोकियोमधील काही भागात वादळाची शक्यता असून येथे युमेनोशिमा पार्क फिल्ड परिसरातही वेगाने वारे वाहत होते. शिवाय, अधूनमधून पावसाचा व्यत्यय येत राहिला. पण, यानंतरही बाद फेरीतील सामने सुरु राहिले आणि दक्षिण कोरियाला या प्रतिकूल वातावरणातही वर्चस्व अबाधित राखण्यात काहीच अडचण आली नाही. त्यांनी आपल्या 18 ऍरोजमध्ये 13 पैकी 10 वेळा स्कोअरिंग हिट नोंदवले आणि पुरुषांच्या गटात देशाला एकूण सहावे ऑलिम्पिक सुवर्ण जिंकून दिले.

तीन दिवसाच्या आतच किमने दक्षिण कोरियन संघाला मिळवून दिलेले हे दुसरे सुवर्णही ठरले. किम जे-डेओकने यापूर्वी मिश्र सांघिक ऑलिम्पिक पदार्पणात सुवर्ण जिंकून दिले. दक्षिण कोरियन संघ तिरंदाजीत नेहमीच पॉवरहाऊस ठरत आला असून त्यांनी टोकियोमध्ये आतापर्यंत 6 पैकी 3 सुवर्णपदके जिंकली आहेत. मागील 9 ऑलिम्पिकमध्ये कोरियाने आतापर्यंत 8 सुवर्ण जिंकले असून फक्त 1992 बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये त्यांना सुवर्णपदकाने हुलकावणी दिली होती.

Related Stories

शेवटच्या चेंडूवर सोळंकीचा षटकार

Patil_p

चॅम्पियन्स लीग फायनल इस्तंबूलमध्ये

Patil_p

ऑक्टोबरमध्ये टी-20 विश्वचषक भरवणे अव्यवहार्य

Patil_p

मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा लांबणीवर

Patil_p

‘साई’ केंद्रातील शिबिरेही लांबणीवर

Patil_p

जागतिक क्रमवारीत नीरज चोप्राची दुसऱ्या स्थानी झेप

Amit Kulkarni
error: Content is protected !!