Tarun Bharat

पुलवामात चकमक, 3 दहशतवादी ठार

Advertisements

श्रीनगर / वृत्तसंस्था

जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा सेक्टरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बुधवारी पहाटे करण्यात आलेल्या कारवाईनंतर दिवसभर सदर भागात शोधमोहीम सुरू होती. काही दहशतवादी पुलवामा सेक्टरमध्ये लपून बसल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून भारतीय सुरक्षा दलाला मिळाली होती. त्याआधारे स्थानिक पोलिसांसह लष्कराने परिसरात शोधमोहीम राबवत बेधडक कारवाई केली. सुरक्षा दलाकडून कारवाई सुरू झाल्याची कुणकूण लागताच दहशतवाद्यांनी बचावासाठी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती सुरक्षा दलाने दिली.

Related Stories

भारतातील कोरोनाबाधितांनी पार केला 73 लाखांचा टप्पा

Rohan_P

भाजपमधून तृणमूल काँग्रेसमध्ये परत गेलेल्या मुकुल रॉय यांची सुरक्षा काढण्याचे गृहमंत्रालयाचे आदेश!

Rohan_P

देशातील 40 टक्के चालकांची दृष्टीक्षमता त्रुटीपूर्ण

Omkar B

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह कोरोना पॉझिटिव्ह

Rohan_P

आसाममध्ये पुरामुळे परिस्थिती भयावह

Patil_p

संकटात असलेल्या टेलिकॉम कंपन्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाचा दिलासा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!