Tarun Bharat

पुलवामात LET कमांडरसह 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

दक्षिण काश्मीरच्या पुलवामामध्ये आज सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली. या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा (LET) कमांडर अबू हुरैरासह दोन स्थानिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलांना यश आले. 

पुलवामामध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री उशिरा शोधमोहीम सुरू झाली. दरम्यान, आज सकाळी एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या गोळीबाराला सुरक्षा दलाने चोख प्रत्युत्तर दिले. यात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. यातील एक दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर असून, अन्य दोघांची ओळख पटलेली नाही. या भागात सुरक्षा दलाकडून अद्याप शोध मोहीम सुरू आहे.

Related Stories

मुंबई आयआयटीचे वर्ग आता ऑनलाइन भरणार

Tousif Mujawar

राज ठाकरेंचा कोकण दौरा जाहीर

datta jadhav

लक्षद्वीपच्या 17 बेटांवर प्रवेशबंदी

Patil_p

श्रीलंकेत महागाईचा भडका !

Archana Banage

25 हजार मंदिरांमध्ये एकाच वेळी भजन-कीर्तन

Patil_p

मनसे आमदार राजू पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारला सूचक इशारा; “कल्याणचा खासदार यापुढे…”

Archana Banage