Tarun Bharat

पुलवामामध्ये एका पाकिस्तानी नागरिकासह जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बुधवारी सकाळी सुरू झालेल्या शोध मोहिमेनंतर चकमक सुरू झाली आणि आतापर्यंत जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. त्यापैकी एक पाकिस्तानी नागरिक आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरु आहे. यामध्ये भारतीय लष्कराला यश मिळत असून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात येत आहे.

दरम्यान या कारवाई नंतर काश्मीर पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले की, या दहशतवाद्यांकडून दोन एम-४ कार्बाइन आणि एक एके सीरीज रायफलसह गुन्हेगारी साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या पाचव्या दिवसांतील ही चौथी चकमक आहे. अलीकडेच दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये लष्कराने नऊ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे सदस्यही सामील होते.

Related Stories

मुख्तार अब्बास नक्वी उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार?

Patil_p

उमदीत टोळी युद्ध, दोघांचा खून, एक चिंताजनक

Abhijeet Shinde

कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी सुमारे ६१ टक्क्यांवर मतदान

Abhijeet Shinde

घाऊक महागाई निर्देशांकात वाढ

Patil_p

2019 मध्ये दर 4 मिनिटात एकाची आत्महत्या

Patil_p

लिपुलेख, कालापानीमधील जमिनी भारतीयांच्या नावावर

datta jadhav
error: Content is protected !!