Tarun Bharat

पुलवामा चकमकीत सोलापूरचे सुनील काळे शहीद

ऑनलाईन टीम / श्रीनगर : 

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील बंडजू भागात आज पहाटे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सोलापूर जिल्ह्यातील पानगांवचे सीआरपीएफ जवान सुनील काळे शहीद झाले.

पुलवामा येथील बंडजू भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलाने शोधमोहीम हाती घेतली. दरम्यान, बंडजू भागात सुरक्षा दलाने दहशतवादी लपलेल्या ठिकाणाला घेराव घातला. यावेळी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबाराला काळे यांनी चोख प्रत्युत्तर दिले. आज पहाटे 4.30 वाजता काळे यांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईत काळे यांना वीरमरण आले.

Related Stories

कृष्ण जन्मभूमी वाद पोहोचला न्यायालयात

Patil_p

आरटीआय कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला; हातापायात ठोकले खिळे

Archana Banage

हिवाळय़ात आरोग्य रक्षण करणारे लाडू

Patil_p

सोलापूर शहरात ५९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, चौघांचा मृत्यू

Archana Banage

जकार्तामध्ये इस्लामिक सेंटर मशिदीला भीषण आग

Archana Banage

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ; अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा ४ सप्टेंबरला होणार

Archana Banage