Tarun Bharat

पुलवामा हल्ल्याप्रकरणी 5 दहशतवाद्यांना जन्मठेप

जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना शिक्षा  ः हल्ल्यात 40 जवान झाले होते हुतात्मा

@वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या 5 दहशतवाद्यांना दिल्लीतील पतियाळा हाउस न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला करणे अन् त्याचा कट रचण्यासाठी न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे. या 5 दहशतवाद्यांमध्ये सज्जाद अहमद खानचे नाव देखील सामील आहे. सज्जादने सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्यादरम्यान सुरक्षा दलांच्या वाहनांविषयी माहिती दहशतवाद्यांना पुरविली होती.

देशभरात दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी तरुणांना भरती करणे आणि प्रशिक्षण देण्याप्रकरणी 5 दहशतवाद्यांना पतियाळा हाउस न्यायालयाने दोषी ठरविले आहे. विशेष न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी सज्जाद अहमद खान, बिलाल अहमदर मीर, मुजफ्फर अहमद भट, इशफाक अहमद भट आणि मेहराजुद्दीनला ही शिक्षा सुनावली आहे. तर तन्वीर अहमद गनी या दहशतवाद्याला पाच वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला आहे.

या सर्व दोषींनी मिळून भारताच्या विरोधात युद्ध पुकारण्याचा कट रचला होता. हे दोषी जैश-ए-मोहम्मदचे सदस्य असण्यासह दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रs, दारुगोळा तसेच रसद पुरवून सहकार्य करत होते असे न्यायालयाने म्हटले आहे.

मार्च 2019 मध्ये एनआयएने पुलवामा हल्ल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्हय़ात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते.

Related Stories

वीज वितरण कंपन्यांना ‘अच्छे दिन’ शक्य

Patil_p

राज्यात नव्या 17 रुग्णांची भर

Patil_p

दानिश सिद्दीकींना दुसऱयांदा पुलित्झर

Patil_p

लोकांना आर्थिक मदत द्या, कर्जही माफ करा : अभिजीत बॅनर्जी

Tousif Mujawar

पश्चिम बंगाल : वादविवादानंतर दासगुप्तांकडून राज्यसभेचा राजीनामा

datta jadhav

कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका

Patil_p