Tarun Bharat

पुलाची शिरोली येथे मोटरसायकल अपघातात युवकाचा मृत्यू

पुलाची शिरोली / वार्ताहर

पल्सर मोटरसायकल स्लीप होऊन झालेल्या अपघातामध्ये कर्नाटक मधील युवकाचाजागेवरच मृत्यू झाला. अभिषेक मल्लेशी सोनगल ( वय २३, रा. पूर, ता. अलनावर, जि. बेळगाव ) असे मृताचे नाव आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी सात वाजता पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली औद्योगिक वसाहतींमधील मनुग्राफ इंडिया लिमिटेड कंपनी समोर झाला.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, अभिषेक सोनगड हा नवीन बजाज पल्सर मोटर सायकल घेऊन शिरोली एमआयडीसी मध्ये आला होता. महामार्गावरून जात असताना त्यांनी वेगावर नियंत्रणासाठी डिस्क ब्रेक लावला यामध्ये त्याचे गाडीवरचे नियंत्रण सुटून गाडी स्लीप झाली. मोटारसायकल स्लीप झाल्यामुळे अभिषेकचे डोके महामार्गावर जोरात आपटले. या मध्ये तो जागीच ठार झाला.

याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला.

Related Stories

कात्यायनीदेवीची आकर्षक उत्सवमूर्तीची खडी स्वरूपातील पूजा

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात 24 तासांत 122 नवे रूग्ण

Archana Banage

आधी नुकसान भरपाई द्या, मग ड्रेनेज लाईन जोडा

Archana Banage

तरुण भारत ‘अस्मिता’तर्फे उद्या पौष्टीक खाद्यपदार्थ स्पर्धा

Archana Banage

मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक पुन्हा बंद

Archana Banage

गाव गाड्यातली खळ्यावरची मळणी कालबाह्य

Archana Banage