आपल्या सदाबहार अभिनयाने मालिका, चित्रपटांमध्ये आपली वेगळी छाप सोडणारा अभिनेता पुष्कराज चिरपुटकर आता कपाळी गंध-बुक्का, हाती भगवी पताका घेऊन कीर्तनात दंग दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. त्याचा हा विठ्ठल नामाचा गजर शेमारू मराठीबाणा वाहिनीवरील ‘गजर माऊलीचा उत्सव कीर्तनाचा’ या कार्यक्रमासाठी असणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता पुष्कराज चिरपुटकर करणार आहे. वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. वारकरी संप्रदाय आणि लोकभावना, श्रद्धा यांचे नाते अतूट आहे. मान्यवर कीर्तनकारांच्या ओघवत्या शैलीत, रसाळ भाषेत आणि नेमकेपणाने प्रत्येक गोष्टीचा वेध घेत रंगणारा हा कार्यक्रम मला सुद्धा बरचं काही देणारा आहे असं पुष्कराज सांगतो. ‘गजर माऊलीचा उत्सव कीर्तनाचा’ कार्यक्रमाच्या निमित्ताने एक वेगळा अनुभव व संत परंपरा जवळून जाणून घेण्याची संधी मला मिळाली. शेमारू मराठीबाणा वाहिनीवरील ‘गजर माऊलीचा उत्सव कीर्तनाचा’ या ‘आषाढवारी विशेष’ कीर्तन मालिकेतंर्गत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन रंगणार आहे. रविवार 4 जुलैपासून सुरु झालेला हा कार्यक्रम दररोज सायंकाळी
6 वा. पहाता येईल. ह.भ.प. उत्तम महाराज बडे, ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे,
ह.भ.प.चंद्रकांत महाराज वांजळे, ह.भ.प. सौ.संगीताताई येनपुरे चोपडे, ह.भ.प. नेहाताई भोसले साळेकर, ह.भ.प. महादेव महाराज बोराडे शास्त्राrजी आदि नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन या कार्यक्रमात ऐकायला मिळणार आहे.


previous post
next post