Tarun Bharat

पुष्पक एक्सप्रेसवर दरोडा; प्रवाशी तरुणीवरही बलात्कार

ऑनलाईन टीम / कल्याण :

लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये इगतपुरी ते कसारादरम्यान सात ते आठ दरोडेखोरांनी ट्रेनमध्ये घुसून प्रवाशांना लुटले. तसेच धावत्या ट्रेनमध्ये एका 20 वर्षीय प्रवाशी तरुणीवरही या नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी कल्याण जीआरपी पोलिसांनी दोन दरोडेखोरांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास इगतपुरी स्टेशनला पोहोचली. इगतपुरी स्थानकातून मुंबईच्या दिशेने सुटताना ट्रेन स्लो होती. ही ट्रेन स्टेशनजवळच्या बोगद्याजवळ पोहचताच सात ते आठ दरोडेखोर ट्रेनमध्ये चढले. त्यांनी 15 ते 20 प्रवाशांना मारहाण करत त्यांचे मोबाईल आणि पैसे हिसकावून घेतले. त्यानंतर एका प्रवाशी महिलासोबत दरोडेखोरांनी छेडछाड केली. तसेच 20 वर्षीय तरुणीवर धावत्या ट्रेनमध्ये या नराधमांनी बलात्कार केल्याची माहिती मिळत आहे. काही धाडसी प्रवाशांनी दोन दरोडेखोरांना पकडून ठेवले. ट्रेन कल्याण स्थानकात येताच पोलिसांनी या दरोडेखोरांना पोलिसांच्या ताब्यात दिले. उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

Related Stories

छत्रपतीही मावळे तयार करतात- शहाजीराजे

Archana Banage

कागल तालुक्यात ४६ पैकी २१ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा सरपंच, राष्ट्रवादीचा दावा

Archana Banage

भाजप खासदार रामस्वरूप शर्मा यांची दिल्लीत आत्महत्या

Archana Banage

आव्हाड, यशोमती ठाकूरनंतर आता काॅंग्रेसचा मुनगंटीवारांच्या मतदानावर आक्षेप

Abhijeet Khandekar

दहावी-बारावी बोर्ड परीक्षा ऑफलाईनच

Archana Banage

VIDEO-कोल्हापूर:दूधगंगा उजव्या कालव्याला भगदाड

Rahul Gadkar
error: Content is protected !!