Tarun Bharat

पुष्प नक्षत्रात गडगडाटासह पावसाची हजेरी

Advertisements

दमदार पावसाने शेतकरी सुखावला,

प्रतिनिधी/ बेळगाव

रविवारी पुष्प नक्षत्राला सुरुवात झाली. मात्र म्हणावा तसा पाऊस पडला नव्हता. सोमवारीही सकाळपासून पावसाने उघडीप दिली होती. मात्र दुपारीनंतर ढगांच्या गडागडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तर शेतकरी काही प्रमाणात सुखावला होता.

सोमवारी पावसाने सकाळपासून उघडीप दिली होती. मात्र दुपारनंतर जोरदार हजेरी लावली असून शेतकरी सुखावला आहे.या पावसामुळे हवेमध्ये कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. मान्सूनचे योग्यवेळेत आगमन झाल्यानंतर पुन्हा दमदार पाऊस कोसळला. त्यामुळे नदी, नाले प्रवाहीत झाले आहेत. शेतकऱयांनी जवळपास खरीप पेरणी पूर्ण केली आहे. यावषी पावसाने चांगली साथ दिली आहे. मागील वषी महापूर आल्यामुळे पाऊस म्हटले की शेतकऱयांबरोबरच सर्वसामान्य जनतेमध्येही भितीचे वातावरण पसरले होते. मात्र सध्या तरी पावसाने अत्यंत योग्यवेळेत हजेरी लावून शेतकऱयांना दिलासा दिला आहे. सोमवारीही सायंकाळी पडलेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.

गेल्या चार दिवसांपासून बेळगाव परिसरात पावसाची रीपरिप सुरु होती. अधूनमधून हलक्मया सरी कोसळत होत्या. मात्र सोमवारी दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक दुकानांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरुन तारांबळ उडाली होती. सोमवारीही झालेल्या संततधार पावसामुळे गांधीनगर, बी. एस. येडियुराप्पा मार्गावर पाणी साचून होते. त्यामुळे वाहने चालविताना इतर वाहनांवर त्याचे पाणी शिंथडत होते. गांधीनगर येथील भुयारी मार्गामध्ये नेहमीच पाणी साचत असते. सोमवारीही झालेल्या दमदार पावसानंतर कंबरभर पाणी साचून होते. त्यामधून वाहन चालविताना चालकांना कसरत करावी लागली. पावसाने गटारी तुडुंब भरुन पाणी रस्त्यावरुन वाहत होते. कोरोनामुळे तोंडाला मास्क पावसापासून संरक्षण मिळविण्यासाठी रेनकोट आणि छत्रीचा आधार घेताना नागरिक दिसत होते.

या संततधार पावसामुळे फेरीवाले, भाजीविपेते आणि बैठय़ा व्यापाऱयांची धावपळ उडाली. खरेदीसाठी नागरिकांनी पाण्यातून वाट काढत तसेच भीजतच खरेदी करावी लागली. काही जणांनी पाऊस येणार नाही म्हणून विनाछत्रीच बाजारात दाखल झाले होते. मात्र दुपारनंतर सुरु झालेल्या दमदार पावसाचा चांगलाच फटका बसला. गटारीतील पाणी रस्त्यावर आल्यामुळे सर्वत्र कचरा पसरला होता.

शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे ते रस्ते उखडून जाण्याची भिती व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी गटारीतील पाणी रस्त्यावर येत होते. फुटपाथवरही पाणी साचल्याचे दिसून येत होते. गटारींची अवस्था दयनीय झाली आहे. दुपारनंतर झालेल्या पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांना व नट्टी लावण्यात आलेल्या पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यावषी पावसाने शेतकऱयांची योग्य साथ दिली आहे. पुष्प नक्षत्रात ढगांच्या गडगडाट झाल्यामुळे पाऊस होईल की नाही, अशी शक्मयता वर्तविण्यात येत होती. मात्र दुपारनंतर झालेल्या दमदार पावसामुळे सारेच सुखावले आहेत. तालुक्मयातील सर्वच भागात पावसामुळे समाधान व्यक्त होत असले तरी अजूनही पिकांना पावसाची गरजअसल्याचे मत व्यक्त होत अहाहे.

Related Stories

बीपीएल कार्ड वितरणाला कधी सुरुवात?

Amit Kulkarni

स्कायटच आनंद अकादमी,सिग्नेचर विजयी

Amit Kulkarni

किल्ला तलाव विकासासाठी 7 कोटींची योजना

Patil_p

यंदाही परिवहनच्या व्यावसायिक हंगामावर पाणी

Amit Kulkarni

एटीएम मशीन फोडण्याचा रामतीर्थनगर येथे प्रयत्न

Amit Kulkarni

सरकारची अवस्था नाविक नसलेल्या बोटीसारखी : दिनेश गुंडूराव

Archana Banage
error: Content is protected !!