Tarun Bharat

पुसेगावात 65 हजारांचा गुटखा जप्त; 2 जण ताब्यात

वार्ताहर / पुसेगाव :

पुसेगाव ता. खटाव येथील छ. शिवाजी चौकाच्या आसपास असलेल्या पानपट्टीत अवैधरित्या गुटखा विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने पुसेगाव पोलिसांनी अचानक धाड टाकून सुमारे 64 हजार 623 रुपये किंमतीच्या गुटख्यासह दोन जणांना ताब्यात घेतल्याची माहिती पुसेगावचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी दिली.

याबाबत पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर यादव यांनी पुसेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शितोळे तपास करत आहेत. येथील द्वारका पान शॉप व रुपेश पान शॉप येथे अवैधरित्या बेकायदेशीर गुटखा विक्री होत असल्याची माहिती पुसेगाव पोलिसांना मिळताच सपोनि संदीप शितोळे, सहायक फौंजदार आनंदराव जगताप,पोलीस नाईक आनंदा गंबरे, शिवाजी सुतार, पुष्कराज जाधव, सचिन जगताप व शिवाजी माने यांनी सापळा रचून या दोन्ही पानपट्टीच्या आडोशाला गुटख्याची बेकायदेशीर विक्री करताना अक्षय सतीश देवकर व राजेंद्र शिवाजी जाधव यांना ताब्यात घेतले .तसेच या दोघांकडून 64 हजार 623 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला.

Related Stories

सलग दुसऱ्या दिवशी बाधित वाढीचा आलेख खाली

datta jadhav

किसनवीर कारखान्यावर 1017 कोटींचे दायित्व कर्ज

datta jadhav

दिवाळीच्या साहित्यांनी सजली बाजारपेठ

Patil_p

सातारा : कोरोना कामकाजाची प्रतिबंधात्मक नियमावली जाहीर

Archana Banage

पहाटेचा शपथविधी… ती बेईमानी नव्हती का ?

Archana Banage

भात खाचर जलमय

Patil_p