Tarun Bharat

पुसेसावळीत बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

पुसेसावळी / वार्ताहर :

पुसेसावळी येथील बँक ऑफ इंडियाच्या आवारात असलेले एटीएम मशीन रात्री उशिरा अज्ञातांनी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न फोल ठरला.

या बँकेच्या आवारात रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक नसतो. त्यामुळे चोरट्यांनी एटीएमच्या कॅमेऱ्यावर चिकटपट्ट्या लावून गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही.
सकाळी बँकेचे कर्मचारी स्वच्छता करण्यासाठी आल्यानंतर झालेला प्रकार त्याच्या लक्षात आला. त्यामुळे त्याने तातडीने बँकेच्या अधिकारी वर्गाला सदरची घटना घडल्याची माहिती दिली. त्यानंतर तातडीने पो.हवा.प्रशांत पाटील यांनी तातडीने ८:३० वाजण्याच्या दरम्यान, घटनास्थळी भेट दिली.परंतू बँकेचे अधिकारी माहिती मिळूनही तातडीने न आल्यामुळे पोलिसांनाच ताटकळत बसावे लागले. सातारा येथील श्वान पथक व ठसेतज्ञांनी हजेरी लावत शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या ठिकाणी कोणताही सुगावा लागला नाही.

Related Stories

आवश्यक पाटण तालुक्यातील येराड ठरतोय ‘हॉट स्पॉट’

Amit Kulkarni

सातारा : प्रशासनाच्या निष्काळजीपणाच्या निषेधार्थ सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

Archana Banage

शुभवार्ता : अखेर सातारा जिल्हा कोरोनामुक्त

datta jadhav

सातारा जिल्ह्यात दिवसभरात 19 जण कोरोनामुक्त तर 14 बाधित

Archana Banage

सातारा : विनामास्क फिरणार्‍या ६९ जणांवर वाई पोलिसांनी केली कारवाई

Archana Banage

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रस्ता रोखो अन् जेलभरो

Patil_p