Tarun Bharat

पुसेसावळीत भरारी पथक ऍक्टिव्ह मोडवर……

Advertisements

वार्ताहर/ पुसेसावळी

पुसेसावळीत भरारी पथकाच्या कारवाईने सुमारे 7 हजार 900 रुपयांची दंड करण्यात आली. रविवारी पुसेसावळीत भरारी पथक दाखल झाले.विनामास्क फिरणाया ग्राहकांना तसेच दुकानदारांना त्यासंबंधीचा दंड आकारण्यात आला.तसेच,पोलीसांच्या मदतीने डबलसीट,ट्रिपलसीट जाणाया दुचाकीस्वारांकडूनही दंड वसूल करण्यात आला.पुसेसावळी गणात विनामास्क फिरणारे तसेच,दुचाकीवरुन डबल सीट प्रवास करणाया सुमारे 51 जणांवर कारवाई करण्यात आली. काही व्यापायांनी पथकाबरोबर वाद देखील घातला.मात्र,पथकाने आपली कारवाई योग्यरित्या बजावली.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेशाची कडक अंमलबजावणी  करण्यास सुरुवात केली आहे.जे विना मास्क फिरतात त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणि सोशल डिस्टनन्स न पाळनाया व्यापायांवर दंड करण्यासाठी एक पथक नेमले आहे.त्या पथकाकडून ऍक्टिव्ह मोडवर कारवाई सुरू आहे.

या कारवाईने सध्यातरी पुसेसावळीत जागरुकता निर्माण झाली आहे.गेले दोन दिवस ग्रामपंचायत प्रशासनाच्यावतीने ध्वनीक्षेपणाच्या माध्यमातून गावात दवंडी दिली होती.

Related Stories

तळीये गावातील 261 घरांची पुनर्बांधणी वेळेत करा : जितेंद्र आव्हाड

Tousif Mujawar

देशावर येणार पुन्हा वीज संकट; कसे ते पाहूया

Kalyani Amanagi

सामाजिक वनीकरणात गौण खनिजाचे बेकायदेशीर उत्खनन

Archana Banage

सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना मुंबईला हलवणार

Archana Banage

अहिल्यादेवीं जन्मस्थळाचे दर्शन घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही : आ. पडळकर

Abhijeet Khandekar

गुरसाळेमध्ये सोमेश्वर केसरी किताबाचा मानकरी ठरला बालारफिक शेख

Patil_p
error: Content is protected !!