Tarun Bharat

पूरग्रस्तांच्या खात्यावर उद्यापासून १० हजार रुपये जमा होणार; विजय वडेट्टीवार यांची माहिती

Advertisements

मुंबई/प्रतिनिधी

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरामुळे अनेकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या सर्वांना राज्य सरकारने तातडीची १० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती. आत ही मदत पूरग्रस्तांच्या खात्यावर शुक्रवारपासून जमा होणार असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

दरम्यान, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरामुळे अनेकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या सर्वांना राज्य सरकारने तातडीची १० हजार रुपयांची मदत उद्या शुक्रवारपासून पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याचं मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.

विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पूरग्रस्तांना तातडीने जाहीरकेलेली मदत पुरग्रस्तांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. दरम्यान, रोख रकमेचं वाटप केलं तर अनेक आरोप होतात. पैशाचं वाटप बरोबर झालं नाही, गैरप्रकार झाले, असे आरोप होतात. त्या भानगडीत आम्हाला पडायचं नाही. त्यामुळे उद्यापासूनच आम्ही त्यांना हे पैसे देणार आहोत. तशी व्यवस्था करणार आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.

Related Stories

पेट्रोल परवडतय मग दूध का नाही?

Patil_p

जग चिंतेत मात्र चीनने तालिबान पुढे केला मैत्रीचा हात

Abhijeet Shinde

मुद्रांक शुल्कातून उद्दिष्टाच्या आठ कोटी अधिक शासनास महसूल

Sumit Tambekar

पाक सरकार खरेदी करणार ‘या’ दिग्गज अभिनेत्यांची घरे

datta jadhav

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढताच; आज ५७ रुग्णांची भर तर दोघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

गृहमंत्र्यांनी तुमच्यासमोर १०० कोटींची मागणी केली का?; परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाचा सवाल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!