Tarun Bharat

पूरग्रस्तांच्या मदतीला वंचित बहुजन आघाडीची धाव

ओटवणे/ प्रतिनिधी-

वंचित बहुजन आघाडीच्या सावंतवाडी शाखा आणि सावंतवाडी येथील ब्लू स्टार स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू कपडे व इतर साहित्यांचे वितरण करण्यात आले.


जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी वंचित बहुजन आघाडी सावंतवाडी शाखा आणि सावंतवाडीतील ब्लू स्टार स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने सावंतवाडीत मदत केंद्र सुरु करण्यात आले होते. दोन दिवसात या मदत केंद्रात अनेक दात्यानी मदत मदतीचा हात पुढे केला. यावेळी जमा झालेली मदत, अन्नधान्य किट आणि कपडे ओटवणे, सरमळे, विलवडे, वाफोली, बांदा, शेर्ले, इन्सुली शिरोडा आदी पूरग्रस्त गावात देण्यात आली.


यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, सावंतवाडी तालुका महासचिव संदीप जाधव, सावांतवडी तालुकाध्यक्ष मोहन जाधव, सावंतवाडी शहर प्रमुख, प्रदीप कांबळे, मालवण तालुका अध्यक्ष अक्षय कदम, तसेच ब्लू स्टार स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष योगेश वाडकर, खजिनदार प्रशांत पाटणकर, शाहरुख खलील खान, ओटवणे शाखा अध्यक्ष मधुकर जाधव, कोषाध्यक्ष आनंद जाधव, सदस्य रवी जाधव, साटेली गाव शाखा सचिव यशवंत जाधव, कृष्णा जाधव (तुळस) आदी उपस्थित होते.

Related Stories

कोकण बोर्डामार्फत 10 वी चे 31,526 विद्यार्थी देणार परीक्षा

Patil_p

रविवारी रंगणार कंकणाकृती सूर्यग्रहण नाटय़

Patil_p

पूररेषेविरोधात दाखल झाल्या 13,300 हरकती!

Patil_p

चिपळुणच्या गाळासंदर्भात उद्याच्या ‘कॅबिनेट’मध्ये निर्णय!

Patil_p

माजी मुख्याध्यापिका सविता गाडेकर यांचे निधन

Anuja Kudatarkar

गद्दाराची व्याख्या अन् मंत्रीपदाचे निकष नेमके काय?

Patil_p