Tarun Bharat

पूरग्रस्त कुटुंबांना मोफत धान्य, केरोसीन

जिल्हाधिकाऱयांची माहिती : प्रति कुटुंब 25 किलो धान्य देणार

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

अतिवृष्टी व पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून निराधार झालेल्या कुटुंबांना प्रत्येकी दहा किलो गहू, दहा किलो तांदूळ, पाच किलो तूरडाळ आणि पाच लिटर केरोसीन मोफत देण्याची सूचना तहसीलदारांना दिली आहे. बाधित कुटुंबांकडून मागणी झाल्यास तांदळाचे प्रमाण वाढवून एकूण 20 किलो अन्नधान्य देण्यात येईल. सावंतवाडी तालुक्मयातील गाळेल येथे एनडीआरएफचे एक पथक कोसळलेल्या दरडीत बेपत्ता तरुणाचे शोधकार्य अद्यापही करीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मंगळवारी दिली.

जिल्हय़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्णतः पडझड झालेली पाच, अंशतः पडझड झालेली पक्की घरे 260, अंशतः पडझड झालेल्या कच्च्या घरांची संख्या 24, नष्ट झालेल्या झोपडय़ांची संख्या चार आहे. तर बाधित गोठय़ांची संख्या 115 आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरपरिस्थितीमध्ये 39 गावांतील 290 कुटुंबांतील 1 हजार 271 व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे जिल्हय़ात 26 मोठी दुधाळ जनावरे, दोन लहान दुधाळ जनावरे आणि एक ओढकाम करणारे जनावर मृत झाले आहे. जिल्हय़ात शाळा, शासकीय इमारत अशा 17 सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले असून 324 खासगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. महावितरणचे 32 लाख 91 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

जिल्हय़ातील ज्या ठिकाणी अद्यापही पाणी आहे, अशा शेत पिकांचे पंचनामे वगळता इतर ठिकाणचे पंचनामे सुरू आहेत. लवकरच हे पंचनामे पूर्ण होतील, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.

Related Stories

शेती पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या युवकाचा शॉक लागून मृत्यू

Archana Banage

कबड्डीपटू अजय शिंदेंचा अपघातात जागीच मृत्यू

Patil_p

कवी अजय कांडर लिखित ‘युगानुयुगे तूच’ काव्यसंग्रहावर तरुणाईचे चर्चासत्र

Archana Banage

संजू परब यांनी वक्तव्य मागे घ्यावे!

NIKHIL_N

कोलगावातील बेपत्ता व्यक्तीचा आडेलीत गळफास स्थितीत आढळला मृतदेह 

Anuja Kudatarkar

सातार्डा महात्मा गांधी विद्यामंदिर कमिटीच्या अध्यक्षपदी बाळकृष्ण बर्डे तर उपाध्यक्षपदी संदीप प्रभू

Anuja Kudatarkar