Tarun Bharat

पूरस्थितीचा सामना करण्यासाठी मनपाकडून आवश्यक उपाययोजना

प्रतिनिधी/ बेळगाव

मागील वषी झालेल्या पावसाचा धसका महापालिका प्रशासनाने घेतला असून, यावषी पावसाळय़ात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, याकरिता तयारी चालविली आहे. पूर परिस्थितीचा सामना करण्यासह खबरदारीच्या उपाय योजना म्हणून पाण्याचा निचरा होण्यासाठी नाल्यांची स्वच्छता आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी पाईप घालण्याचे काम सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी दिली.

पूरपरिस्थितीमुळे शहरवासियांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. समस्यांचे निवारण करताना महापालिका प्रशासनाच्या नाकीनऊ आले. ठिकठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले होते. विविध उपनगरात नाल्यांचे पाणी शिरल्याने रस्ते पाण्याखाली गेले होते. तळघरात पाणी शिरल्याने रहिवासी वसाहतीमधील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करण्याची वेळ निर्माण झाली होती. नाला स्वच्छता मोहीम व्यवस्थित राबविण्यात आली नसल्याने पूर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप शहरवासियांनी केला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याचा चांगलाच धसका घेतला आहे. नानावाडी, मराठा कॉलनी, इंद्रप्रस्थनगर, शास्त्रीनगर, समर्थनगर, गुड्सशेड रोड, शिवाजीनगर अशा विविध भागातील नाल्यांची स्वच्छता करून पाण्याचा निचरा होण्यातील अडथळे दूर करण्यात आले आहेत. आवश्यक ठिकाणी नाल्यांची रुंदी वाढविण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी दिली. सध्या कोरोना विषाणूंचा प्रसार वाढत असल्याने महापालिकेवरील जबाबदारी वाढली आहे. तरीदेखील पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या असल्याचे आयुक्तांनी सांगितले. अरुंद नाल्यांमुळे आणि ठिकठिकाणी असलेल्या अडथळय़ांमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पण महापालिका प्रशासनाने शक्मय तितक्मया उपाययोजना राबविल्या आहेत. नाला स्वच्छता, गटारी स्वच्छता तसेच नाल्यांतील अडथळे दूर करणे, आवश्यक ठिकाणी नाल्यांचे बांधकाम करणे, नाल्यांमध्ये असलेल्या जलवाहिन्या, विद्युत वाहिन्या, गॅस वाहिन्या हटविण्यात आल्या आहेत. त्यामुळे मागील वषीप्रमाणे पावसाचे पाणी साचण्याची समस्या निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवाजीनगर परिसरात किल्ला तलावाच्या शेजारी असलेल्या नाल्यामधील पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पाईप लहान असल्याने पाणी अडत होते. परिणामी शिवाजीनगर परिसरात पाणी शिरत होते. त्यामुळे या ठिकाणी मोठय़ा आकाराच्या पाईप घालून आवश्यक उपाययोजना राबविण्यात आल्या असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.

मागील वषी जीर्ण झालेली घरे कोसळली होती. त्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले होते. त्यांना शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात आली आहे. अशा जुन्या घरांची माहिती घेऊन धोकादायक घरांमधून अन्यत्र स्थलांतर होण्याची सूचना नागरिकांना करण्यात आली आहे. पावसाळय़ात अशा धोकादायक घरांमध्ये नागरिकांनी वास्तव्य करू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी केले.

चौकट शिवाजीनगर येथील नाल्यातील पाण्याचा निचरा होण्यासाठी राष्ट्रीय महामार्गालगत मोठय़ा पाईप घालण्याचे काम सुरू करण्यात आले. सदर कामाचा शुभारंभ सोमवारी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी महापालिका साहाय्यक कार्यकारी अभियंते महांतेश नरसण्णावर, माजी नगरसेवक सादीक इनामदार, कंत्राटदार एन. एस. चौगुले, मनपाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Related Stories

काकती रयत संपर्क केंद्राच्यावतीने माती परीक्षण कार्यक्रम

Patil_p

मराठा मंडळ हायस्कूलच्या वार्षिक क्रीडास्पर्धा उत्साहात

Amit Kulkarni

स्वकुळ साळी समाजातर्फे धान्य वाटप

Amit Kulkarni

बदलत्या हवामानाचा काजू उत्पादकांना फटका

Amit Kulkarni

कोरोना लसीकरणासाठी गर्दी

Amit Kulkarni

सुपर फायटर्स संघाकडे पाटीदार समाज चषक

Amit Kulkarni