Tarun Bharat

पूराची स्थिती जाणून घेण्यासाठी राजन कोरगावकर यांनी दिली तिळारीला भेट

प्रतिनिधी /पेडणे

गेल्या काही दिवसांपुर्वी पेडण्यातील हळर्ण,तळर्ण, चांदेल, इब्रामपूर भागात पुरस्थिती निर्माण झाली होती. त्या पुरात अनेक लोकांचे नुकसान झाले.अनेकांच्या घरात पाणी शिकले होते. अनेकांची शेती वाहुन गेली होती. पुरस्थितीची पहाणी केल्यानंतर पुरस्थितीचे कारण जाणून घेण्यासाठी मिशन फॉर लोकल संघटनेचे अध्यक्ष राजन कोरगांवकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह तिलारी धरणावर जावून विचारपुस केली.

राजन कोरगांवकर यांनी पहाणी केल्यानंतर असे निर्देशनास आले की पुरस्थिती ही नैसर्गिक होती.

 “तिलारी धरणाचे दरवाजे उघडले” ही अफवा चुकीची आहे. मुळात हे दरवाजे बंदच केले नव्हते, हे दरवाजे 20 ऑगस्ट नंतरच बंद केले जातात असे  सुत्रांकडून कळण्यात आहे.

तिलारी धरणाचे वाढलेले पाणी गोव्यात पोहचण्यासाठी किमान तिन ते चार तास लागतात,  सतर्कतेचा इशारा दिला असता तर नुकसानग्रस्ताचे प्रमाण काही अंशी कमी झाले असते. असे राजन कोरगांवकर यांनी म्हटले. पेडण्यातील स्थानिक आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी नुकसानग्रस्ताची रस्तावर थांबुन विचारपुस केली खरी पण माणसांच्या वेदना आणी पुरा मागिल कारणं जाणुन घेण्याचा प्रयत्न केला का? असे प्रश्न त्यांनी उपस्थिती केले आहे.

Related Stories

वाढीव वीज बील प्रश्नी वास्कोत काँग्रेसचे पुन्हा आंदोलन

Patil_p

प्रवीण आर्लेकर यांचा आज भाजप पक्षात प्रवेश कार्यकर्ते यांच्यात उत्साह

Amit Kulkarni

कचरा करात वाढ आपण केलेली नाही

Amit Kulkarni

करमल घाटातील नियोजित रस्ता पर्यावरणाचा नाश न करता व्हावा

Amit Kulkarni

गांधी मार्केट, न्यू मार्केट सुरू झाल्याने ग्राहकांची सोय

Omkar B

काणकोणात भातशेतीच्या कामाला जोर

Amit Kulkarni