Tarun Bharat

पूर्वभागात भात पीक पोसवणीस प्रारंभ

वार्ताहर/ सांबरा

तालुक्याच्या पूर्वभागातील बासुमती भात पिकाच्या पोसवणीस प्रारंभ झाला असून इतर भात पिकेही पोटरीला आली आहेत. त्यामुळे शेतकरीवर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

पूर्वभागातील बसवण कुडची, निलजी, मुतगा, सांबरा, बसरीकट्टी, शिंदोळी, बाळेकुंद्री खुर्द, होन्निहाळ, मोदगा आदी परिसरात काही दिवसांपूर्वी चांगला पाऊस झाला होता हा पाऊस योग्यवेळी झाल्याने भातपिकाला अत्यंत लाभदायक ठरला आहे. सध्या बासुमती भात पोसवण्यास प्रारंभ झाला आहे. तर इतर भात पिकेही पोसवण्याच्या प्रक्रियेत आहेत. या भागात बऱयाच दिवसापासून पावसाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे शिवारातील पाणी आटले होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने पुन्हा शिवारात पाणी झाले आहे. त्यामुळे शेतकऱयांना दिलासा मिळाला आहे. सध्या भात पिकासह ऊस पिकही बहरात आले आहे. शिवारात भांगलणीची कामे जोरात सुरु आहेत.

Related Stories

बागलकोट जिल्हय़ात 19 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले

Patil_p

बैठक अर्थसंकल्पाची, चर्चा समस्यांची

Amit Kulkarni

खंजर गल्ली येथे मटकाबुकीला अटक

Tousif Mujawar

केरुर यात्रा भंडाऱ्याच्या उधळणीत साजरी

Amit Kulkarni

राणी चन्नम्मा नगर येथे झाड कोसळून विजखांब्यांचे नुकसान

Tousif Mujawar

नाशिक विमानसेवा कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द

Amit Kulkarni