Tarun Bharat

पूर्वी पुजारा तर आता पंतप्रमाणे फलंदाजी!

मुख्य आर्थिक सल्लागारांची टिप्पणी 11 टक्के विकासदर शक्य

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2021 मध्ये भारताचा आर्थिक विकासदर 11.5 टक्के राहण्याचा अनुमान व्यक्त केला आहे. कोरोना महामारीदरम्यान मोठय़ा अर्थव्यवस्थांमध्ये केवळ भारताचा आर्थिक विकासदर दुहेरी आकडय़ात राहू शकतो. भारताचा आर्थिक विकासदर 11 टक्क्यांच्या नजीक राहणार असल्याचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे. महामारीच्या काळात भारताची आर्थिक वाटचाल ही पुजाराच्या फलंदाजीप्रमाणे होती. तर आता ती पंतसारखी आक्रमक वाटचाल करत असल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.

कोरोनाकाळात भारत सरकारने 80 कोटी लोकांसाठी मोफत धान्याची व्यवस्था केली होती, हे एक उत्तम पाऊल होते. महामारीच्या पहिल्या 5-6 महिन्यांमध्ये मोठी अनिश्चितता होती. त्या काळात सरकारला खबरदारीने पावले उचलण्याची गरज होती. सरकारनेही स्वतःच्या आवश्यकतांवर लक्ष दिले. तर अनलॉक सुरू होताच सरकारने पुन्हा मागणी वाढविण्यावर भर दिल्याचे सुब्रमण्यम म्हणाले.

भारताची रिकव्हरी व्ही आकारात राहिली आहे. पहिल्या तिमाहीत विकासदर सुमारे 24 टक्क्यांनी कमी राहिला. दुसऱया तिमाहीत तो 7.5 आकडय़ांनी कमी राहिला. तिसऱया तिमाहीत हा दर सकारात्मक राहणार असल्याचा अनुमान आहे. चौथ्या तिमाहीत विकासदराचा आणखीन विस्तार होणर आहे. म्हणजेच पूर्ण एक वर्षाचा विकासदर पाहिल्यास तो व्ही आकारात राहिला आहे. पीएमआय देखील मागील काही दिवसांमध्ये सुधारला आहे. सेवा क्षेत्रातील प्रवास अन् पर्यटन क्षेत्रात अद्याप काही प्रमाणात मंदी असली तरीही अन्य क्षेत्रांमध्ये मोठी वृद्धी दिसून येत आहे. याचमुळे 2021 मध्ये विकासदर 11 टक्के राहण्याचा अनुमान असल्याचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणाले.

कोरोना महामारीमुळे अल्पकालीन वेदना झाल्या, पण दीर्घकालीन लक्ष्यांवर भर देण्यात आला. याकरिता साहसाची गरज असते. भारताने अत्यंत पारदर्शकता दाखविल्याचे आयएमएफनेही म्हटले आहे. गुंतवणुकदारही प्रगल्भ धोरणनिर्मिती पाहत असतात. महामारीच्या काळात भारताने अनेक सुधारणा घडवून आणल्या आहेत. भारताने मागण्यांसह पुरवठय़ावरही विशेष लक्ष दिल्याचे सुब्रमण्यम यांनी म्हटले आहे.

Related Stories

एक्सप्रेस रेल्वेचे जनरल तिकिट मिळणार

Abhijeet Khandekar

दापोली नगर पंचायत ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ मध्ये देशात दुसरी

Archana Banage

भक्तांसाठी खूशखबर! गणेशोत्सव यंदा धुमधडाक्यात

Archana Banage

हुमणीचे एकात्मिक नियंत्रण अल्पखर्चिक आणि प्रभावी

Archana Banage

Satara : लिंबच्या माजी उपसभापतींवर जीवघेणा हल्ला

Abhijeet Khandekar

१७ नोव्हेंबरला दोडामार्गात विद्युत ग्राहक मेळावा 

Anuja Kudatarkar