Tarun Bharat

पूर्व लडाखमधील प्रलंबित प्रश्न सोडविण्यावर भारत-चीनचे एकमत

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

पूर्व लडाखमधील सीमावाद सोडविण्यासाठी 
भारत-चीन कमांडर स्तरावरील चर्चेची 12 वी फेरी शनिवारी पार पडली. त्यानंतर दोन दिवसांनी भारतीय लष्कराने या बैठकीसंदर्भात संयुक्तपणे निवेदन जारी केले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही देशांनी सीमावादावर 9 तास सखोल चर्चा केली. त्यात सैन्य मागे घेण्याबाबत आणि परस्पर सामंजस्य वाढविण्यावर चर्चा झाली. बैठकीत पूर्व लडाखमधील सीमावादावरून निर्माण झालेली कोंडी आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शविली. तथापि, सीमाभागातील सैन्य मागे घेण्याबाबत कोणताही ठोस निर्णय या बैठकीत घेण्यात आला नाही. सध्या या संवेदनशील क्षेत्रात दोन्ही देशातील 60 ते 60 हजार सैनिक तैनात आहेत. 

दरम्यान, हॉट स्प्रिंग आणि गोगराच्या मुद्द्यावर  पुढील फेरीत तपशीलवार चर्चा करण्यात येणार आहे.

Related Stories

300 कोटींच्या घोटाळय़ात सत्यपाल मलिक यांची चौकशी

Patil_p

मृत पित्याला जिवंत करण्यासाठी…

Patil_p

शत्रूची प्रत्येक हालचाल टिपता येणार

Patil_p

आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलूही कोरोना पॉझिटिव्ह

Patil_p

बॉम्बस्फोटप्रकरणी 10 आरोपी दोषी

Patil_p

सिद्दिकी कप्पन यांच्या जामिनावर आज सुनावणी

Patil_p