Tarun Bharat

पृथ्वीराज माळी कला उत्सव स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर प्रथम

सांगली : प्रतिनिधी

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कला उत्सव 2021-22 मध्ये सांगलीच्या शांतिनिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचा विदयार्थी, युवा शाहिर पृथ्वीराज देवानंद माळी याने पारंपारिक लोकसंगीत गायन या कलाप्रकारात प्रथम क्रमांक मिळवला. राज्यासोबत सांगलीचे नाव कला उत्सव स्पर्धेमध्ये देशपातळीवर उंचावले.

पुणे येथून या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. यात 580 स्पर्धक सहभागी झाले होते. पृथ्वीराज याने या स्पर्धेत पोवाडा सादर केला. त्याच्या बहारदार आणि तडफदार पोवाड्याने या स्पर्धेत त्याला राष्ट्रीय स्तरावरचे यश मिळवून दिले. संस्थेचे संचालक गौतम पाटील, उपसंचालक बी. आर. थोरात, धनंजय माने, प्रशासकीय अधिकारी एम.के.आंबोळे यांनी त्याचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक संजय खांडेकर, अनिकेत शिंदे, शाहिर देवानंद माळी यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Stories

लखनऊ-आग्रा महामार्गावर भीषण अपघातात 5 ठार, 18 जखमी

datta jadhav

दिल्लीसंबंधीचे विधेयक राज्यसभेतही संमत

Patil_p

”ड्रिम वर्ल्ड लगतची जागा शासकीय नव्हे”

Archana Banage

गोव्यात अडकलेले इचलकरंजीतील नागरिक सुरक्षित घरी

Archana Banage

Kolhapur : ‘राजशेखर’च्या कुटूंबियांसाठी कोल्हापूरकरांचा मदतीचा हात

Abhijeet Khandekar

उत्तरप्रदेशातील मिर्ची गँगच्या म्होरक्याला मुंबईत अटक

datta jadhav