Tarun Bharat

पृथ्वी संकटात , कमी उर्जा वापराच्या जीवनशैलीकडे चला !

ऑनलाईन टीम  / पुणे  :  

‘वार्षिक वापरातून प्रतिमाणशी २ टन कार्बन डायॉक्साईड उत्सर्जन ही जागतिक मर्यादा आपण ठरवून घेतली आहे. मात्र,प्रमाण आताच दुपटीहून अधिक आहे. भारतातदेखील उत्सर्जनाच्या लक्ष्मणरेषेचे उल्लंघन झालेले आहे. विकसित देशांवर अधिक जबाबदारी आहे. ग्रीन हाऊस उत्सर्जन कमी केले पाहिजे. त्यासाठी इंधन , उर्जा वापर कमी करुन जीवनशैलीच बदलायला  हवी. उर्जेचा वैयक्तिक वापर, इमारतीमधील वापर, उद्योगांतील वापर, दैनंदिन वापरातील गोष्टी -खरेदी या सर्वातून  पर्यावरणास हानीकारक ठरणाऱ्या वायूंचे उत्सर्जन कमी होणे गरजेचे आहे. ‘लो कार्बन कंपनी ‘ असे ब्रॅंडिंग कंपन्यांनी करावे असा पर्यावरण संवर्धनाचा आग्रह आपण धरला पाहिजे’, असे प्रतिपादन ‘समुचित एन्व्हायरोटेक’  संचालक डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांनी केले. 
महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘कार्बन अकाऊंटिंग आणि ग्रीन इकॉनॉमिक्स ‘ या विषयावरिल राज्यस्तरीय  दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले होते. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. कर्वे ‘ कार्बन अकांऊंटिंग’ या विषयावर  बोलत होत्या. 
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ शैला बुटवाला,पर्यावरणशास्त्र विषयाच्या विभाग प्रमुख विजयालक्ष्मी शिंदे, डॉ गौरी देवस्थळे , डॉ. भूषण पाचपांडे यावेळी उपस्थित होते.

Related Stories

बार्शीत पोलीस कर्मचाऱ्या सह पत्नीही कोरोना बाधित, रोजची हजेरी ऑनलाईन घ्यावी

Archana Banage

सूत व्यापाऱयाच्या अपहरणाचा प्रयत्न

Archana Banage

सोलापूर शहराला चार तर हद्दवाढ भागाला पाच दिवसाआड पाणीपुरवठा

Archana Banage

सोलापूर : हैद्रा येथे जुगार अड्ड्यावर छापा; १६ जणांना अटक

Archana Banage

टोलनाक्यावर फास्टॅगची रिटर्न लूट

prashant_c

सोलापूर : वैरागच्या व्यापाऱ्याने केलेल्या ‘त्या’ पोस्टची सर्वत्र चर्चा

Archana Banage